Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे विस्तारण्यात आले आहे. हजारो किलोमीटर चे नवीन महामार्ग विकसित झाले आहेत. गत दहा वर्षांच्या काळात जेव्हापासून देशात मोदी सरकार आले आहे तेव्हापासून देशात अनेक मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत.
मात्र महाराष्ट्रात असे काही महामार्ग प्रकल्प आहेत ज्यांची कामे अजूनही रखडलेली आहेत. मुंबई गोवा महामार्ग प्रकल्प हा देखील असाच एक प्रकल्पातून याचे काम तब्बल 12 वर्षांपासून सुरु आहे. अद्याप या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही.
यामुळे मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र भविष्यात मुंबई ते गोवा हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
कारण की एक नवा महामार्ग विकसित केला जाणार आहे. 26 हजार कोटी रुपये खर्च करून 500 km लांबीचा एक नवीन महामार्ग विकसित होणार असून या महामार्गाचे काम कॅलिफोर्निया येथे असणाऱ्या पॅसिफिक महामार्गाच्या धर्तीवर होणार आहे.
मनमोहक समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगातून हा महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाला समांतर राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत रेवस ते रेडी दरम्यान नवीन सुपर हायवे विकसित होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत सात नवीन पूल तयार होणार असून या पुलांची लांबी 27 किलोमीटर एवढी राहणार आहे. हा महामार्ग चार पदरी राहणार असून कोकणातील जवळपास 90 हून अधिक पर्यटन स्थळांना या महामार्गामुळे रस्त्याची नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
हा मार्ग मुंबई – रेवास – अलिबाग – काशिद – मुरुड – हरिहरेश्वर – गुहागर – गणपतीपुळे – रत्नागिरी – देवगड – मालवण – तेरेखोल असा राहणार आहे. यामुळे भविष्यात मुंबई ते गोवा हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.
मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करताना सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते मात्र ही वाहतूक कोंडी या नव्या महामार्गामुळे बऱ्यापैकी नियंत्रणात येईल आणि यामुळे प्रवाशांचा प्रवास भविष्यात अगदीच सुरक्षित आणि जलद होणार आहे.
या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते कोकणात आणि पुढे गोव्यात जाणे सोयीचे होणार आहे. कोकणातील एकात्मिक विकासाला आणि पर्यटनाला या प्रकल्पामुळे चालना मिळेल असा विश्वास तज्ञांनी देखील व्यक्त केला आहे.