महाराष्ट्रात आणखी एक नवीन महामार्ग तयार होणार ! राज्य मंत्रिमंडळाची ‘या’ महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी, कसा असणार रूट ? कोणत्या तालुक्यांमधून जाणार ? वाचा….

कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जालना नांदेड समृद्धी महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय हा देखील असाच एक महत्त्वाचा निर्णय. समृद्धी महामार्गाद्वारे जालना-नांदेड ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. याद्वारे शहरांतील 226 किलोमीटरचे अंतर 179.8 किलोमीटर एवढे कमी होणार आहे.

Published on -

Maharashtra New Expressway : काल शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत.

यामध्ये राज्यातील एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्याच्या निर्णयाचा देखील समावेश आहे. कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना-नांदेड महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थातच आता जालना ते नांदेड महामार्ग नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. अर्थातच राज्यातील मराठवाडा विभागातील नांदेड, परभणी व जालना जिल्हा समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला.

खरंतर येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. निवडणुकांच्या तारखा येत्या दोन-तीन दिवसात जाहीर होतील अशी शक्यता आहे.

अर्थातच राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक राहणार आहे. यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा होती. यानुसार कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

जालना नांदेड समृद्धी महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय हा देखील असाच एक महत्त्वाचा निर्णय. समृद्धी महामार्गाद्वारे जालना-नांदेड ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. याद्वारे शहरांतील 226 किलोमीटरचे अंतर 179.8 किलोमीटर एवढे कमी होणार आहे.

तसेच मुंबई आणि नांदेड दरम्यानचा 12 तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे. परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे.

प्रस्तावित जालना-नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैदराबादला जोडला जाणे अपेक्षित आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे जालना ते नांदेड हा प्रवास वेगवान होणार आहे.

मराठवाड्यातील या जिल्ह्यामधील नागरिकांना भविष्यात जलद गतीने मुंबईला जाता येणे शक्य होणार आहे. जालना नांदेड महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा असल्याने यामुळे मराठवाड्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe