महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्युज ! नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार, राज्यातील ‘या’ 18 Railway Station वर थांबणार

होळीच्या आधीच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे कडून कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी महाराष्ट्रातील तब्बल 18 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आहे. ही गाडी 9 मार्चपासून चालवली जाणार असून तीस मार्चपर्यंत या गाडीला मुदत देण्यात आली आहे.

Published on -

Maharashtra Railway News : मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे, अर्थातच आता देशात सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. येत्या काही दिवसांनी भारतात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. होळीच्या सणाला अनेक जण आपल्या गावाकडे परतत असतात तसेच काहीजण पिकनिकला जातात. सुट्ट्या मिळाल्यात की अनेकांचे पाय कोकणाकडे वळतात.

सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी कोकणासारखे दुसरे सुंदर डेस्टिनेशन शोधूनही सापडत नाही. यामुळे अनेकजण सुट्ट्यांच्या कालावधीत कोकणात फिरण्यासाठी निघत असतात. दरम्यान होळीला आपल्या मूळ गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच कोकणात फिरायला निघणाऱ्या पर्यटकांसाठी कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. उधना जंक्शन ते मंगळुरु जंक्शन या रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी या मार्गावरील महाराष्ट्रातील तब्बल 18 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार ? या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक ?

उधना जंक्शन ते मंगळूरु जंक्शन या मार्गावर ही गाडी 9 मार्च ते 30 मार्च या कालावधीत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे म्हणजेच ही एक द्विसाप्ताहिक गाडी राहणार आहे.

या काळात ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि रविवारी उधना जंक्शन येथून रात्री आठ वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी सायंकाळी पाच वाजून 45 मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचणार आहे. तसेच, परतीच्या प्रवासात मंगळुरुहून ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी उधनाला पोहोचणार आहे.

ही ट्रेन कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार

रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही विशेष गाडी या मार्गावरील वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुम्ता, मुरूडेश्वर, भटकळ, मुकाम्बिका रोड, कुन्दपुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल, थोकुर या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe