Maharashtra Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील रेल्वे नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले आहे. जगातील विकसित देशांमध्ये रेल्वेच्या नेटवर्क फारच स्ट्रॉंग असते आणि यामुळेच देशाचे रेल्वे नेटवर्क देखील स्ट्रॉंग बनवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत.
देशातील जो भाग अजून पर्यंत रेल्वेने जोडलेला नाही तो भाग सुद्धा रेल्वेने जोडला जातोय. अशातच आता देशात असा एक नवा रेल्वे मार्ग विकसित होणार आहे जो की थेट दुसऱ्या देशासोबत जोडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या आर्थिक राजधानीला अर्थातच मुंबईला एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहेत.

हा मार्ग मुंबई ते दुबई दरम्यान तयार होणार असून या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते दुबई दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर सध्या मुंबई ते दुबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. मुंबई ते दुबई हा प्रवास हवाई मार्गाने केला जातोय.
पण भविष्यात हा प्रवास रेल्वेने शक्य होणार आहे. मुंबई ते दुबई दरम्यान हा रेल्वे मार्ग विकसित होणार असून हा एक बहुचर्चित अंडरवॉटर ट्रेन प्रकल्प आहे. सध्या हा प्रकल्प अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. यासाठी सध्या चर्चेचे सत्र सुरू आहे.
चर्चा आणि अभ्यासांसह या प्रकल्पाचे काम हळूहळू पुढे जात आहे, असे यूएई नॅशनल अॅडव्हायझर ब्युरो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल शेही यांनी सांगितले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अल शेही यांनी यूएई आणि भारतामधील वाहतुकीत क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेबद्दल माहिती दिली आहे.
काय आहेत डिटेल्स
या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प सात वर्षांपूर्वीच प्रस्तावित करण्यात आला होता. 2018 मध्ये पहिल्यांदा या प्रकल्पाची चर्चा झाली. 2018 मध्ये हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. तेव्हापासूनच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून हा प्रकल्प दोन्ही देशांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
मात्र अजून या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झालेला नाही. व्यवहार्यता अभ्यास अजूनही सुरूच आहे, पण अल शेही यांनी पुष्टी केली आहे की, हा उपक्रम सातत्याने प्रगती करत आहे. मात्र असे असेल तरी विविध क्षेत्रांकडून मान्यता मिळेपर्यंत कोणतीही अधिकृत आर्थिक वचनबद्धता करता येणार नाही असे अल शेही यांनी म्हटले आहे.
म्हणजे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असले तरी देखील या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास नेमक काय सांगतो यावरच या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. म्हणूनच, हा प्रकल्प सुरू होण्याची स्पष्ट वेळ सध्या तरी अनिश्चित आहे, एवढे मात्र नक्की.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रस्तावित हाय-स्पीड अंडरवॉटर ट्रेनचे उद्दिष्ट यूएई आणि भारतामधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे हाच आहे. सध्या, यूएई ते भारत विमानाने जाण्यासाठी सुमारे चार तास लागतात. मात्र हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई ते दुबई हा प्रवास अवघ्या दोन तासात शक्य होणार आहे.
कारण म्हणजे या रेल्वे मार्गावर समुद्राच्या पोटातून एक हजार किलोमीटर प्रतितास या वेगाने ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट यूएई आणि भारतामधील व्यापारी संबंध वाढवणे हाच आहे. अल शेही यांनी ही ट्रेन केवळ प्रवासी वाहतुकीलाच समर्थन देणार नाही तर तेल आणि पाण्यासह वस्तूंच्या वाहतुकीला देखील सुलभ असेल असे सांगितले आहे.
कोण कोणत्या देशांमधून जाणार रेल्वे मार्ग
खरेतर, या प्रकल्पाचे सर्वात मोठे उद्दिष्टे म्हणजे मध्य भारतातील नर्मदा नदीचे पाणी युएईला वाहून नेण्याची योजना. तसेच तिकडून कच्च्या तेलाची आयात होणार आहे. या रेल्वेमार्गाच्या रूट बाबत बोलायचं झालं तर हा मार्ग पाकिस्तान, बांगलादेश आणि ओमानसह अनेक देशांना जोडणार आहे.
ज्यामुळे एक सक्षम आणि नवा व्यापारी मार्ग उद्योगासाठी खुला होणार आहे. साहजिकच याचा भारताच्या एकात्मिक विकासाला सुद्धा मोठा हातभार लागणार आहे. ही ट्रेन अरबी समुद्राखालून धावणार आहे. समुद्रात 20 ते 30 मीटर खोल काँक्रीट बोगदा विकसित केला जाईल आणि त्यातून ही ट्रेन धावणार आहे.
मात्र या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान अद्याप अभ्यासाच्या टप्प्यात आहे, परंतु दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी हा मार्ग फारच मौल्यवान ठरणार अशी शक्यता आहे. यामुळे या प्रकल्पाबाबत पुढेनेमके काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.