जाता-जाता मान्सूनचा दणका….! 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान देशातील ‘या’ 11 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार

सध्या देशात परतीचा पाऊस सुरू असून काही राज्यांमध्ये परतीच्या पावसाची तीव्रता वाढलेली आहे. असे असतानाच भारतीय हवामान खात्याने आज 7 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा देशात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे. आजपासून 11 ऑक्टोबर पर्यंत देशातील 10 राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Rain : सप्टेंबरच्या शेवटी मानसून ने आपला परतीचा प्रवास सुरू केला. आपल्या महाराष्ट्रातही त्याने परतीचा प्रवास सुरु केलाय. आतापर्यंत देशातील बहुतांश राज्यांतून मान्सून माघारी फिरला आहे. आपल्या राज्यातून 5 ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरू झाला असून नंदुरबार जिल्ह्यातुन मान्सून माघारी फिरला आहे.

येत्या काही दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी फिरणार आहे. 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान मान्सून आपल्या महाराष्ट्रातून निघून जाईल असे दिसते. मात्र जाता जाता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे.

सध्या देशात परतीचा पाऊस सुरू असून काही राज्यांमध्ये परतीच्या पावसाची तीव्रता वाढलेली आहे. असे असतानाच भारतीय हवामान खात्याने आज 7 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा देशात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे.

आजपासून 11 ऑक्टोबर पर्यंत देशातील 10 राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

7 ऑक्टोबर : भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी 4 राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये केरळ, तामिळनाडू तसेच कोस्टल कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक यांचा समावेश आहे.

8 ऑक्टोबर : उद्या 11 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. या काळात केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्ये पाऊस पडू शकतो.

9 ऑक्टोबर : 9 ऑक्टोबरला देशातील 11 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप, कर्नाटक, केरळ, अरुणाचल प्रदेश, नागालँड, तामिळनाडू, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये मुसलधारते ते अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

10 ऑक्टोबर : या दिवशी काही राज्यांमधून पावसाचा जोर कमी होणार आहे. पण, IMD ने 6 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये लक्षद्वीप, केरळ, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे.

11 ऑक्टोबर : शुक्रवारी पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे. पण, लक्षद्वीप, केरळ, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe