महाराष्ट्रातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू, ‘या’ जिल्ह्यातून माघारी फिरला मान्सून, कधीपासून माघारी फिरणार मान्सून ?

Maharashtra Rain : मान्सून 2024 संदर्भात भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर, यावर्षी राजस्थानमधून मान्सूनने परतीचा प्रवास सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने सुरु केला होता.

यामुळे महाराष्ट्रातून देखील मान्सून नियोजित वेळेपेक्षा सात-आठ दिवस उशिरानेच परतीचा प्रवास सुरू करेल असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात मोसमी पावसाने महाराष्ट्रातून त्याच्या नियोजित वेळेतचं परतीचा प्रवास सुरू केला आहे.

काल, अर्थातच शनिवारी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला असल्याची घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास हा त्याच्या नियोजित वेळेत म्हणजेच 5 ऑक्टोबरलाचं सुरू झाला आहे.

मान्सून दरवर्षी 10 ऑक्टोबरच्या सुमारास महाराष्ट्रातून एक्झिट घेतो. यंदाही त्याचा परतीचा प्रवास हा नियोजित वेळेत सुरू झाला असल्याने 10 ऑक्टोबरच्या सुमारास महाराष्ट्रातून मान्सून माघार घेणार असे म्हटले जात आहे.

जर त्याच्या परतीच्या प्रवासात काही अडथळे आलेत तर 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सून महाराष्ट्रातून माघार घेईल असे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत, आता राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच तीन दिवसांपूर्वी अर्थातच 3 ऑक्टोबरला सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे.

दरम्यान आज अर्थातच 6 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील संपूर्ण कोकण अर्थातच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्र अर्थात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जेनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. खरे तर सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे.

काही भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू झाली आहे तर काही शेतकरी अजूनही खरीप पिकांची काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत जर राज्यात परतीचा पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेता आपल्या शेती पिकांची अन शेतीमालाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.