मान्सून 2024 संदर्भात मोठी बातमी ! Monsoon ‘या’ तारखेला महाराष्ट्राचा निरोप घेणार, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी थेट तारीखचं सांगितली

खुळे सांगतात की, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर या आठ अशा एकूण 18 जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस आता फक्त ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता आणि काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे अक्षरशः पूरस्थिती तयार झाली आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले.

पावसाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने काही शहरांमधील शाळांना सुट्टी देखील जाहीर केली होती. शेतकरी बांधवांचे देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन सुगीच्या दिवसांमध्ये बरसलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस हरपले आहेत.

अशातच आता हवामान अभ्यासकांनी पावसा संदर्भात मोठी माहिती दिली आहे. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी आजपासून पुढील आठ दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, आज अर्थातच 28 सप्टेंबर पासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे.

खुळे सांगतात की, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर या आठ अशा एकूण 18 जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस आता फक्त ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

या भागात जवळपास 5 ऑक्टोबर पर्यंत फक्त ढगाळ हवामान राहील आणि अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस होणार असा अंदाज आहे. या भागातील पावसाचा जोर दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे.

पण, मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये अशा एकूण 18 जिल्ह्यात मात्र एक तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. या भागात एक ते पाच ऑक्टोबर दरम्यान मात्र फक्त ढगाळ हवामान राहील आणि किरकोळ पाऊस बरसणार असा अंदाज आहे.

खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे 5 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा राज्यातील हवामान चेंज होणार आहे. 6 ऑक्टोबरपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. खुळे सांगतात की 6 ऑक्टोबरपासून पुढील सात दिवस म्हणजेच 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे.

यावेळी त्यांनी मान्सून केव्हा निरोप घेणार याचीही माहिती दिली आहे. 16 ऑक्टोबर नंतर मान्सून केव्हाही आपल्या महाराष्ट्राचा निरोप घेऊ शकतो असे खुळे यांनी आपल्या अंदाजात म्हटले आहे. परंतु मान्सून परतला तरी महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार आहे कारण की चक्रीवादळाचा सिझन चालू आहे. चक्रीवादळामुळे राज्यात ऑक्टोबर अखेर देखील पावसाची शक्यता तयार होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe