Maharashtra Second Bullet Train News : भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रात विकसित होतोय. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार असून सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील बहुतांशी कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. या महाराष्ट्रातील महत्त्वाकांशी प्रकल्पा अंतर्गत एकूण बारा स्थानके विकसित होणार आहेत.
येत्या काही वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि नागरिकांना मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन ने प्रवास करता येणार आहे. असे असतानाच आता महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे.
दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प विकसित होणार अशी घोषणा केली आहे.
अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील हा दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प नेमका कसा राहणार, या मार्गावर किती स्थानके राहणार, याची लांबी किती राहणार ? यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प
भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी नेत्र दीपक कामगिरी केली आहे. देशातील रेल्वेचे नेटवर्क आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या ट्रेन प्रवाशांसाठी फायद्याचा ठरत आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस मुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट झाला असून त्यांना सुरक्षित प्रवास करता येतोय. वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता 350 किलोमीटर वेगाने धावणारी बुलेट ट्रेन देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर पहिल्यांदा बुलेट ट्रेन धावणार असून यानंतर मुंबई ते नागपूर दरम्यानही बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास भविष्यात अवघ्या साडेतीन तासांत करता येणं शक्य होईल. या मार्गावर ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल.
महत्त्वाची बाब अशी की या नव्याने प्रस्तावित बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. हा मार्ग 766 किमी लांबीचा असेल. या मार्गावर नागपूर, खापरी, वर्धा, पुलगाव, करंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर ही 13 स्टेशनं असतील.
या स्थानकावर बुलेट ट्रेन थांबा घेणार. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झाला होता. आता राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यावर या प्रकल्पाला प्रत्यक्षात गती मिळेल अशी आशा आहे.