म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! Mhada प्राधिकरणाने ‘या’ नियमात केला मोठा बदल, आता अर्ज करण्यासाठी….

Tejas B Shelar
Published:
Mhada News

Mhada News : मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे, सर्वसामान्य लोक या महानगरात घर खरेदीसाठी म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून दिली जात असते.

यासाठी म्हाडाच्या विविध मंडळाकडून दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली जात असते. यंदाही म्हाडाच्या विविध मंडळाकडून हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. मुंबई आणि कोकण मंडळ लवकरच लॉटरी जाहीर करणार आहे.

राज्याचे गृहनिर्माण विकास मंत्री अतुल सावे आणि म्हाडा उपाध्यक्ष संदीप जयस्वाल यांनी मुंबई मंडळ लवकरच दोन हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. यानुसार उद्या अर्थातच 8 ऑगस्टला मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठीची जाहिरात काढली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.

विशेष बाब अशी की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीचं मुंबई मंडळाच्या या 2030 घरांसाठी प्रत्यक्षात संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

यासाठी मुंबई मंडळाकडून आणि सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई मंडळपाठोपाठ कोकण मंडळ देखील जवळपास 9 हजार घरांसाठी लॉटरी काढणार असल्याची बातमी समोर आली आहे.

विशेष म्हणजे ही देखील लॉटरी विधानसभा निवडणुकीच्या आधी निघणार आहे. अशा या परिस्थितीचं मुंबईत म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे म्हाडाने आपल्या नियमात मोठा बदल केला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हाडाच्या घरासाठी लॉटरीमध्ये अर्ज करताना उत्पन्न पुरावा द्यावा लागतो. यात पती-पत्नीच्या एकत्रित कौटुंबिक उत्पन्नाचा विचार केला जातो. पण, काही अर्जदार पती-पत्नीपैकी फक्त एकाचेचं उत्पन्न दाखवत आहेत.

तसेच पती-पत्नी घरासाठी स्वतंत्र अर्ज करत आहेत. म्हणजे अनेक लोक संयुक्त कुटुंबाचे उत्पन्न लपवण्यासाठी आम्ही वेगळे झाल्याचे सांगतात. कोर्टात केस सुरु आहे, असे सांगून म्हाडाची दिशाभूल करण्याचे प्रकार अशा मंडळींकडून सर्रासपणे केले जात आहेत.

यामुळे म्हाडाने आता हा गैरप्रकार थांबवण्यासाठी आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार आता अशा अर्जदाराला डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

म्हणजे आता म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या घटस्फोटीत जोडप्यांना डिक्री प्रमाणपत्र देखील द्यावे लागणार आहे. यामुळे याचा सर्वसामान्य गरजवंत नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. म्हाडाच्या लॉटरीत होणारे गैरप्रकार यामुळे थांबणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe