Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेची घोषणा राज्याच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली. घोषणा झाल्यानंतर या योजनेचा शासन निर्णय निघाला. शासन निर्णय नंतर योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. या योजनेचे अर्ज 1 जुलैपासून भरले जात आहेत. यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
म्हणजे आता अर्ज भरण्यासाठी अवघे 29 दिवस बाकी आहेत. आतापर्यंत जवळपास दोन कोटी महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असा एक अंदाज आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, परीत्यक्त्या आणि निराधार महिला पात्र ठरणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलाचं यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऑफलाइन सुविधा अंतर्गत महिलांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज करावा लागतो.
तसेच ऑनलाईन सुविधा अंतर्गत महिलांना नारीशक्ती दूत या एप्लीकेशनवर अर्ज सादर करता येत आहे. दरम्यान आता याच योजने संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेत आता आणखी एक मोठा बदल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज भरणे आता आधीच्या तुलनेत आणखी सोपे होणार आहे.
खरे तर या योजनेचे अर्ज भरताना महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. अर्ज भरण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लांबच लांब रांगा आहेत. एप्लीकेशनचे सर्वर सातत्याने डाऊन होत आहे. यामुळे महिलांचा मोठा खोळंबा होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
पण आता या योजनेचे अर्ज भरणे सोपे होणार आहे कारण की सरकारने यासाठी एक नवीन वेबसाईट म्हणजेच संकेतस्थळ सुरू केले आहे. यामुळे आता लाडक्या बहिणीचा अर्ज लवकर सादर होणार आहे. घरबसल्या महिलांना जलद गतीने अर्ज सादर करता येणार आहे.
www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आता लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे हे संकेतस्थळ कालपासून अर्थातच एक ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. मात्र ज्या महिलांनी आधीच या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांनी पुन्हा अर्ज करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
नक्कीच शासनाने सुरू केलेल्या या नवीन पोर्टलमुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन वेबसाईटमुळे आता महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना मोठी मदत मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे 19 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. 19 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने या मुहूर्तावर शिंदे सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.