Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका वर्षात पात्र महिलेच्या खात्यावर 18 हजार रुपये जमा होणार आहेत. यामुळे सध्या या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सूरु आहे. एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज केले जात आहेत.
तसेच 31 ऑगस्ट पर्यंत यासाठी अर्ज सादर करता येणार आहेत. आतापर्यंत जवळपास दोन कोटी महिलांनी यासाठी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे अजूनही अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. सरकारने यासाठी नारीशक्ती दूत हे एप्लीकेशन विकसित केले आहे. या एप्लीकेशन मधून अनेक महिलांनी अर्ज भरले आहेत.
मात्र एप्लीकेशन मधून अर्ज भरताना महिलांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हीच अडचण लक्षात घेता सरकारने आता या योजनेसाठी एक नवीन संकेतस्थळ विकसित केले आहे. www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून देखील आता महिलांना अर्ज भरता येत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी अर्ज केला आहे.
मात्र अजूनही ज्या महिलांनी अर्ज सादर केलेला नाही त्यांच्यासाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आता अर्ज करता येणार नसल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण खरंच लाडक्या बहिण योजनेचे अर्ज बंद झाले आहेत का या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, नारिशक्ती दूत या एप्लीकेशन मधून अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. एप्लीकेशन मध्ये अर्ज भरताना NO NEW FORM ACCEPTED असा एरर येत आहे. यामुळे आता या योजनेचे अर्ज बंद झाले आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.
खरे तर ही समस्या अनेक महिलांना आली आहे. पण हा एक एरर आहे. या योजनेचे अर्ज बंद झालेले नाहीयेत. या योजनेसाठी महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामुळे जर तुम्हाला ही या योजनेसाठी अर्ज करताना अशी अडचण येत असेल तर तुम्ही सकाळी लवकर 4-5 वाजता किंवा रात्री उशिरा प्रयत्न करू शकता.
कसे आहे योजनेचे स्वरूप ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र राहणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र राहणार आहेत.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी पात्र राहतील. यासाठी फक्त राज्यातील महिला पात्र राहणार आहेत. तथापि ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहेत.
ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिला यासाठी अपात्र ठरणार आहेत. तसेच ज्या महिलांना आधीच शासनाच्या इतर अन्य योजनांच्या माध्यमातून पंधराशे रुपयांपर्यंतचा लाभ मिळत असेल त्या महिला देखील यासाठी अपात्र ठरणार आहेत.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र महिला यासाठी अपात्र राहणार आहेत.