Mumbai Metro News : मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या डोक वर काढत आहे. वाहतूक कोंडीमुळे या शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की, ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या तिन्ही शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात आहे.
मुंबई बाबत बोलायचं झालं तर शहरातील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. शहरातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित ‘मेट्रो -३ अॅक्वा लाइन’ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले आहे.

या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच आरे ते बीकेसी या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा मेट्रोमार्ग आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या मार्गावर आज सकाळी 11 वाजेपासून मेट्रोची सेवा सुरू होणार असल्याची बातमी मेट्रो प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे. या मार्गावरील पहिली गाडी ही सकाळी 11 वाजता आरे जेव्हीएलआर व बीकेसी या दोन्ही स्थानकांमधून निघणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण आरे ती बीकेसी या मेट्रो मार्गावरील स्थानकांची आणि या मार्गाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किती पैसे खर्च करावे लागणार, या मार्गावरील मेट्रोचे तिकीट दर कसे आहेत? या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत स्टेशनं ?
या मार्गावरील पहिल्या टप्प्यात एकूण दहा स्थानके आहेत. आरे, सीप्झ, एमआयडीसी-अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी २, सहार रोड, विमानतळ टी१, सांताक्रूझ, वांद्रे कॉलनी, बीकेसी ही 10 स्थानके आहेत.
कसे असणार तिकीट दर ?
आरे ते सीप्झ १० रु.
एमआयडीसी-अंधेरी २० रु.
मरोळ नाका २० रु.
विमानतळ टी २ ३० रु.
सहार रोड ३० रु.
विमानतळ टी१ ३० रु.
सांताक्रूझ ४० रु.
वांद्रे कॉलनी ४० रु.
बीकेसी ५० रु.