मुंबईकरांसाठी खुशखबर ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कस राहणार वेळापत्रक ?

पनवेल नांदेड द्विसाप्ताहिक दिवाळी विशेष गाडी 22 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी अडीच वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता आपल्या गंतव्य स्थानी म्हणजेच नांदेडला पोहोचणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Mumbai Railway News

Mumbai Railway News : आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा मोठा पावन पर्व साजरा होत आहे. दरम्यान या दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की रेल्वे प्रशासनाने मुंबईहून दिवाळीच्या काळात एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

खरे तर दिवाळीच्या काळात दरवर्षी बाहेरगावी जाणाऱ्यांची गर्दी असते. मुंबईहून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या मूळ गावी जात असतात. यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते.

अनेकांना कन्फर्म तिकीट सुद्धा मिळत नाही. हेच कारण आहे की दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई ते नांदेड दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल ते नांदेड दरम्यान ही विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पनवेल नांदेड दिवाळी विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक

पनवेल नांदेड द्विसाप्ताहिक दिवाळी विशेष गाडी 22 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी अडीच वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता आपल्या गंतव्य स्थानी म्हणजेच नांदेडला पोहोचणार आहे.

तसेच नांदेड पनवेल विशेष गाडी 21 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी रात्री अकरा वाजता नांदेड येथून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजून 25 मिनिटांनी आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच पनवेलला पोहोचणार आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

मिळालेल्या माहितीनुसार ही दिवाळी विशेष गाडी या मार्गावरील कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना या गाडीचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe