Mutual Fund Scheme : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. अशा परिस्थितीत, अनेकजण थेट शेअर बाजारात इन्वेस्ट करण्यास मागे-पुढे पाहताना दिसत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही शेअर बाजारात थेट पैसे गुंतवताना धोका वाटत असेल तर तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित असणाऱ्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवू शकता.
खरे तर थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला अनेकजण पसंती दाखवतात. म्युच्युअल फंडमध्ये शेअर मार्केटच्या तुलनेत असणारी जोखीम फार कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये एकरकमी गुंतवणूक करता येणे शक्य नसेल तर तुम्ही एसआयपी सुद्धा करू शकता.

एसआयपीमध्ये दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवता येते आणि दीर्घ कालावधीत एक चांगला मोठा फंड तयार करता येतो. खरंतर अलीकडील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतोय.
दरम्यान जर तुम्हालाही म्युच्युअल फंड मधून चांगला परतावा हवा असेल तर काही गोष्टींची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान आज आपण म्युच्युअल फंड मधून जोरदार परतावा मिळवायचा असेल तर कोणत्या पाच टिप्स फॉलो केल्या पाहिजेत याचाच एक आढावा घेणार आहोत.
योग्य Mutual Fund निवडा : तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे सगळे फंड एकसारखे नसतात. म्हणून तुम्हाला सुरुवातीला एक योग्य म्युच्युअल फंड निवडावा लागणार आहे. यासाठी निधी व्यवस्थापकाची मागील कामगिरी, खर्चाचे प्रमाण आणि कौशल्य यावर आधारित वेगवेगळ्या निधींचा शोध घ्या. तसेच तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी जुळणारे- इक्विटी, डेट किंवा हायब्रिड – फंड विचारात घ्या.
स्टेप अप SIP करा : जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न दरवर्षाला वाढत असेल तर तुम्ही एसआयपी ची रक्कम सुद्धा वाढवणे आवश्यक आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न वाढताना SIP रक्कम वाढवायचा विचार अवश्य करा. SIP मधील स्टेप-अप पद्धत तुम्हाला म्युच्युअल फंडांच्या क्षमतेचा फायदा घेण्यास मदत करू शकते. यामुळे उत्पन्न वाढल्यानंतर एसआयपीची रक्कम सुद्धा वाढवा.
शिस्त पाळा : जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करणार असाल तर आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक आहे. बाजाराच्या चढउताराच्या काळात देखील तुम्हाला एसआयपी सुरूच ठेवायची आहे.
पोर्टफोलिओकडे लक्ष असू द्या : तुम्ही SIP करत असाल तर गुंतवणूक करण्याची आणि नंतर विसरून जाण्याची सवय काही चांगली नाही. म्हणून तुमच्या एसआयपी पोर्टफोलिओचा नियमितपणे आढावा घ्या, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करता येतो. तुम्ही नेहमी असे फंड लक्षात घ्यायला हवेत जे बेंचमार्कपेक्षा सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. जर तुमची सध्याची गुंतवणूक नकारात्मक परतावा देत असेल तर फंड काढून दुसऱ्या फंडात स्विच करणे सुद्धा फायद्याचे ठरते.
SIP लवकर सुरु करा : कमी वयात एसआयपी सुरू केली तर तुम्हाला अधिकचा फायदा मिळणार आहे. कमी वयात एसआयपी सुरू केल्यास तुम्हाला कंपाऊंडिंगचा मोठा फायदा मिळतो आणि तुम्हाला दीर्घ कालावधीत एक चांगला फंड तयार करता येतो.