Mutual Fund SIP : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे.
खरंतर गुंतवणुकीसाठी बहुतांशी लोक बँकेच्या आणि पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांमध्ये तसेच पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र यामधून मिळणारा परतावा हा शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड पेक्षा कमी असतो.
![Mutual Fund SIP](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Mutual-Fund-SIP-3.jpeg)
म्हणूनच अलीकडे जास्तीचा परतावा मिळवण्यासाठी बहुतांशी लोक शेअर मार्केट आणि म्युचल फंड मध्ये पैसा गुंतवत आहेत. यातील म्युचल फंड मधील गुंतवणूक ही शेअर मार्केटच्या गुंतवणुकीपेक्षा थोडीशी कमी जोखीम पूर्ण आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लोकांना शेअर मार्केटचे फारसे ज्ञान नाही असे लोक सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात. म्हणूनच अनेक जण म्युचल फंड मध्ये एसआयपी करून चांगला परतावा मिळवत आहेत.
दरम्यान जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड ही डायव्हर्सिफाइड इक्विटी स्कीम तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड ठरणार फायदेशीर
हा म्युच्युअल फंड फारच जुना आहे. या योजनेला जवळपास 30 वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या तीस वर्षांच्या काळात या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक पंधरा टक्के दराने परतावा देण्याची किमया साधली आहे. या योजनेत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी द्वारे तसेच एकरकमी गुंतवणूक करूनही गुंतवणूकदार कोट्याधीश झाले आहेत.
2 लाखाच्या गुंतवणुकीवर मिळाला 1.40 कोटींचा परतावा
ही योजना १ ऑक्टोबर १९९४ रोजी लाँच झाली. जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक १५.२९ टक्के दराने परतावा दिला आहे.
म्हणजे यात जर कोणी ३० वर्षांपूर्वी अर्थातच योजना सुरू होताना २ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यांना एक कोटी 42 लाख 81 हजार 676 रुपये मिळाले असते. म्हणजेच या काळात फक्त व्याज म्हणून १.४० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असती.
अकराशे रुपयांच्या एसआयपीने बनवले करोडपती
या म्युच्युअल फंड मध्ये जर कोणी ३० वर्षांपूर्वी दरमहा केवळ ११०० रुपयांची SIP सुरू केली असती, तर त्यांचे सध्याचे मूल्य १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते. तीस वर्षाच्या काळात या म्युच्युअल फंडने एस आय पी वर वार्षिक 17.63% दराने परतावा दिला आहे.
यानुसार जर तीस वर्षांपूर्वी या योजनेत दरमहा 1100 रुपयांची एसआयपी केली असती तर गुंतवणूकदाराला आता एक कोटी 44 लाख 9 हजार 392 रुपये मिळाले असते. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही तीन लाख 96 हजार रुपये इतकी राहणार आहे आणि उर्वरित 1 कोटी 40 लाख 13 हजार 392 रुपये हे गुंतवणूकदाराला रिटर्न मिळाले आहेत.