Oneplus च्या चाहत्यांसाठी खुशखबर! Oneplus Open फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 41,000 रुपयांनी घसरली, इथं मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

सध्याच्या वन प्लस ओपनच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. OnePlus Open चा 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट आता फक्त ₹99,998 मध्ये लिस्टेड आहे, जो मूळत: ₹1,39,999 मध्ये लॉन्च झाला होता. बँक ऑफर अंतर्गत, SBI क्रेडिट कार्ड ने पेमेंट केल्यावर 10% इन्स्टंट डिस्काउंट (₹1,000 पर्यंत) मिळू शकतो.

Tejas B Shelar
Published:
Oneplus Open Smartphone Latest Update

Oneplus Open Smartphone Latest Update : वन प्लस च्या चाहत्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्या लोकांना OnePlus Open खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की अलीकडेच लॉन्च झालेला कंपनीचा हा हँडसेट आता ग्राहकांना खूपच स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

हा कंपनीचा एक लेटेस्ट स्मार्टफोन असून यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतील. हा स्मार्टफोन दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये लॉन्च झाला होता आणि हा स्मार्टफोन सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनशी स्पर्धा करणारा आहे.

दरम्यान जर तुम्ही हा वनप्लसचा फोल्डेबल स्मार्टफोन 2025 मध्ये खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला या स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या किमती ऑनलाइन शॉपिंग साइटवर कमालीच्या घसरल्या आहेत आणि यामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत.

ऑक्टोबर 2023 मध्ये लॉन्च झालेल्या OnePlus Open ची किंमत ई-कॉमर्स साइट Amazon वर मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर अमेझॉनवर मोठी डिस्काउंट ऑफर सुरू असून आज आपण याच ऑफरबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अमेझॉन वर वनप्लस ओपनची किंमत कमी करण्यात आली आहे शिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा देखील ग्राहकांना लाभ मिळणार आहे. खरंतर वन प्लस ओपन 2 येत्या काही दिवसांनी लॉन्च होण्याची शक्यता आहे, साधारणता एका महिन्याभरात वनप्लसचा Open 2 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकतो अशी शक्यता आहे.

यामुळे सध्याच्या वन प्लस ओपनच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. OnePlus Open चा 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट आता फक्त ₹99,998 मध्ये लिस्टेड आहे, जो मूळत: ₹1,39,999 मध्ये लॉन्च झाला होता. बँक ऑफर अंतर्गत, SBI क्रेडिट कार्ड ने पेमेंट केल्यावर 10% इन्स्टंट डिस्काउंट (₹1,000 पर्यंत) मिळू शकतो.

यामुळे या फोनची प्रभावी किंमत फक्त ₹98,998 होते. म्हणजेच या स्मार्टफोनच्या किमतीत लॉन्चिंग प्राइस पेक्षा 41 हजार रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आता आपण या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहेत फिचर्स?

कंपनीने अलीकडेच लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 7.82 इंचांची 2K फ्लेक्सी फ्लुइड LTPO 3.0 AMOLED डिस्प्ले देण्यात आले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2,268×2,440 पिक्सल, 1-120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट, 240Hz टच रिस्पॉन्स रेट, आणि 2,800 निट्सची पीक ब्राइटनेस आहे.

कंपनीने यामध्ये 6.31 इंचांची 2K LTPO 3.0 सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले दिले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,116×2,484 पिक्सल, 10-120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट, 240Hz टच रिस्पॉन्स रेट, आणि 2,800 निट्सची पीक ब्राइटनेस आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो आणि त्यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट दिला आहे. या स्मार्टफोनच्या बॅक साईडला तीन कॅमेरे आहेत आणि फ्रंट साईडला दोन कॅमेरे आहेत.

कनेक्टिव्हिटीसाठी या हँडसेटमध्ये ग्राहकांसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.3, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहेत. याचा बॅटरीपॅक देखील चांगला आहे. यामध्ये 4,800mAh ड्युअल सेल बॅटरी आहे जी की 67W SuperVOOC चार्जिंग ला सपोर्ट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe