Panjabrao Dakh Havaman Andaj : गेली काही दिवस विश्रांतीवर असणारा परतीचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. पंजाबरावांनी आज सायंकाळी चार वाजेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे. राज्यात 9 ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होईल आणि पुढील दहा दिवस म्हणजेच जवळपास 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता आहे.
मात्र या दहा दिवसांच्या काळात राज्यात सर्वत्र पाऊस पडणार नाही. या कालावधीत राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
परंतु कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या कालावधीत चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्या शेतीकामांचे नियोजन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
सावधान ! आज पासून पुढील 10 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पंजाबरावांचे मोठे भाकीत
पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, नऊ ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात दररोज भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा राज्यातील शेवटचा पाऊस राहणार आहे.
परंतु हा परतीचा पाऊस राज्यात मोठा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकांचे नुकसान होईल तर रब्बी हंगामासाठी हा पाऊस वरदान ठरेल असे पंजाबरावांनी म्हटले आहे. आजपासून सुरू होणार हा पाऊस गहू आणि हरभरा या रब्बी हंगामातील पिकांसाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे.
नऊ ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, जालना, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार असा अंदाज आहे.
हा पाऊस राज्यातील सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली या भागाकडून सुरू होणार आहे. यानंतर या पावसाची व्याप्ती वाढणार आहे. आज अन उद्या विदर्भात पावसाचा जोर कमी राहील मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये दहा तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हा पाऊस राज्यात जवळपास 18 तारखेपर्यंत कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊनच आपल्या शेतीकामांचे नियोजन आखणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेती पिकांची काढणी पूर्ण केली असेल त्यांनी सुरक्षित ठिकाणी आपला शेतमाल साठवून ठेवणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. कारण की या काळात रात्रीच्या वेळी पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ऐनवेळी धावपळ होऊ शकते आणि शेतमालाचे नुकसान होऊ शकते.