Panjabrao Dakh Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात आगामी काही दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला आहे. राज्यासाठी भारतीय हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केलेला नाही मात्र पुढील तीन दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते असे हवामान खात्यातील तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान होणार अशी भीती वर्तवली जात आहे. असे असतांना आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज दिला आहे.
पंजाबरावांनी महाराष्ट्रात खरंच पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे का? राज्यात आता पुन्हा पाऊस होणार का? याबाबत आपल्या नवीन बुलेटिन मध्ये डिटेल माहिती दिली आहे.
पंजाबरावांचा अंदाज काय म्हणतो?
भारतीय हवामान खात्याने पुढील काही तास राज्यातील उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असे म्हटले. पण पंजाब रावांनी मात्र महाराष्ट्रात फक्त ढगाळ हवामान राहील, पावसाची कुठलीच शक्यता नाही असा नवीन अंदाज दिलाय.
सध्या महाराष्ट्रात पावसाचे वातावरण नाहीये फक्त 14 जानेवारीपासून राज्यातील हवामान थोडेसे बिघडणार आहे. 14 जानेवारी 15 जानेवारी आणि 16 जानेवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते. परंतु या काळात राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे पंजाबरावांनी म्हटले आहे.
राज्यात आता दिवसा सुद्धा थंडीचे अनुभूती येणार आहे. राज्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होईल आणि कडाक्याची थंडी जाणवेल असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. पण 14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये आभाळ राहणार आहे.
ढगाळ हवामानामुळे शेती पिकांवर साहजिकच विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पण राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी पावसाबाबत भीती बाळगू नये असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. परंतु जानेवारी महिन्याच्या शेवटी राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
राज्यात 26 जानेवारी नंतर अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि त्याबाबतचा अंदाज नंतर सांगितला जाईल असे पंजाब रावांनी यावेळी सांगितले.