पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज ; हे 10 दिवस हवामान कोरडं राहील, पण….; कस असणार जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यातील हवामान ?

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आता पुढील काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. पुढील दहा दिवस राज्याचे हवामान कोरडे राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. तसेच आज पासून म्हणजेच 2 जानेवारीपासून महाराष्ट्रातील थंडीचा जोर वाढत राहणार आहे. आज रात्री अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडेल.

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तिथे चक्रीवादळाची निर्मिती झाली आणि याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळाला. राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला आणि यामुळे रब्बी हंगामातील पिकांसमवेतच कांदा पिकाला आणि फळबाग पिकांना मोठा फटका बसला.

यामुळे आता जानेवारी महिन्यातील हवामान कसे राहणार? हा मोठा प्रश्न आहे. जानेवारी महिन्यात तर अवकाळी पाऊस पडणार नाही ना असा सवाल सुद्धा शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय. दरम्यान आता याच संदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी एक नवीन अंदाज जारी केला आहे.

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आता पुढील काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. पुढील दहा दिवस राज्याचे हवामान कोरडे राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. तसेच आज पासून म्हणजेच 2 जानेवारीपासून महाराष्ट्रातील थंडीचा जोर वाढत राहणार आहे.

आज रात्री अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडेल. उद्यापासून सर्वत्र थंडीचा जोर वाढेल आणि हे हवामान रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरू शकते. आगामी दहा दिवस महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट येईल असे पंजाब रावांनी म्हटले आहे.

यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांनी शेतीशी निगडित कामे आटोपून घ्यावीत. गेल्या महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाळी वातावरण होते, काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुद्धा झाला.

बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान होते आणि यामुळे शेती पिकांवर विविध रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव सध्या दिसतोय. यामुळे आता शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी घ्यायची असेल तर घ्यायला हरकत नाही कारण की पुढील दहा दिवस राज्यात कडाक्याची थंडी राहणार असून पाऊस पडणार नाहीये.

एकंदरीत जानेवारीचा पहिला पंधरवाडा राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. एवढेच नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते अशीही शक्यता पंजाबराव आणि यावेळी वर्तवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe