आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार ! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सहा डिसेंबर आणि उद्या 7 डिसेंबर रोजी राज्यातील हवामान खराब राहणार आहे. हे दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र 8 डिसेंबर पासून राज्यातील हवामान कोरडे होईल असे म्हटले जात आहे.

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झालाय. बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी वादळी पावसाने दणका दिलाय. मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगरसहित दक्षिणेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.

विदर्भातील बुलढाणा सहित अनेक भागात पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार समवेत दक्षिणेकडील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. मात्र आज भारतीय हवामान खात्याने सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीनच जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे आठ डिसेंबर पासून राज्यात सर्व दूर हवामान कोरडे राहणार अन पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.

असे असतानाच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील एक नवा हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलीये.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सहा डिसेंबर आणि उद्या 7 डिसेंबर रोजी राज्यातील हवामान खराब राहणार आहे. हे दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र 8 डिसेंबर पासून राज्यातील हवामान कोरडे होईल असे म्हटले जात आहे. आठ डिसेंबरला महाराष्ट्रातील हवामान कोरडे होईल आणि नऊ तारखेपासून राज्यात थंडीचे तीव्रता वाढेल असे पंजाबरावांनी सांगितले आहे.

राज्यात आठ तारखेपासून ते जवळपास 15 तारखेपर्यंत हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. या काळात राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे. मात्र 15 डिसेंबर पासून महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बिघाड पाहायला मिळू शकतो.

15 डिसेंबर नंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा वादळी पावसाची हजेरी लागू शकते असे पंजाब रावांच्या या नव्या हवामान अंदाजावरून स्पष्ट होत आहे.

खरे तर सध्या रब्बी हंगामातील शेती पिके वाढीच्या अवस्थेत आहेत आणि अशा या अवस्थेत जर अवकाळी पाऊस झाला तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. विशेषता कांदा आणि फळबागांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe