फक्त पायाचा अंगठाच नाही तर इतर बोटेही सांगतात तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ? पायाच्या बोटावरून तुमचे व्यक्तिमत्व आणि भविष्य कसे आहे ते पहा ?

पायाच्या अंगठ्यावरून तसेच इतर बोटांवरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येणे शक्य आहे. असं म्हणतात की, माणसाच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही ना काही माहिती देण्याचे काम करतो. डोळ्यांचा आकार, रंग, नाकाचा आकार आणि हाताची बोटेही बरेच काही सांगून जातात.

Tejas B Shelar
Published:
Personality Test Marathi

Personality Test Marathi : हात पाहून भविष्य सांगणारे लोक तुम्ही पाहिले असतील ? तुम्ही तुमचा हात दाखवून तुमचे भविष्य कसे आहे याची माहिती ज्योतिषाकडून नक्कीच घेतली असेल. पण फक्त हात पाहून नाही तर पायाच्या बोटावरूनही व्यक्तीचे भविष्य आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे याचा अंदाज बांधता येतो.

पायाच्या अंगठ्यावरून तसेच इतर बोटांवरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येणे शक्य आहे. असं म्हणतात की, माणसाच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही ना काही माहिती देण्याचे काम करतो.

डोळ्यांचा आकार, रंग, नाकाचा आकार आणि हाताची बोटेही बरेच काही सांगून जातात. एवढेच नाही तर पायाच्या बोटांच्या आकाराच्या आधारे सुद्धा व्यक्तिमत्त्वाची माहिती मिळू शकते. चला तर मग आता जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

लांब आणि गोल : काही लोकांची पायाची बोटे लांब आणि पुढच्या बाजूला गोलाकार असतात. जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील तर समजून जा की हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात. ते नेहमीच त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाने लोकांना आकर्षित करतात.

प्रत्येकाला या लोकांचा सहवास हवाहवासा वाटतो. पैशाच्या बाबतीत या लोकांना नशिबाची परिपूर्ण साथ मिळते आणि हे लोक अपार पैसे कमावतात. कठोर परिश्रमाच्या जोरावर ते भरपूर यश आणि संपत्ती मिळवतात. समाजात या लोकांना चांगला मान सन्मान मिळतो पैशांच्या बाबतीतही हे लोक परिपूर्ण असतात.

सारखी बोटे असणारी लोक : काही लोकांची पायाचा अंगठा सोडता इतर सर्व बोटे सारखी असतात. असे म्हणतात की ज्या लोकांची पायाची सर्व बोटे सारखी असतात अशी लोक संभाषणात चांगले असतात.

या लोकांच्या वक्तृत्वाच्या आणि संभाषणाच्या जोरावर हे लोक प्रत्येकच क्षेत्रात चांगले कामगिरी करतात. हे लोक सहसा त्यांच्या मृदुभाषी स्वभावाने लोकांना आकर्षित करतात. त्यांना चांगले जगणे आवडते. त्यांना प्रवास करायला आवडतो.

पहिले आणि दुसरे बोट सारखे असणारे लोक : काही लोकांचे पहिले आणि दुसरे बोट सारखे असतात. अशा प्रकारचे लोक खूप मेहनती असतात. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ते यशाच्या शिखरावर पोहोचतात. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना खूप ओळख मिळते. त्यांचा स्वभाव चांगला असला तरी काही वेळा या लोकांचे वाद होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe