पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोदी सरकार तीन कोटी घरे बांधणार, योजनेसाठीच्या पात्रता, कागदपत्रे अन अर्ज कसा करायचा ? पहा….

पीएम आवास योजना 2022 पर्यंतच सुरू राहणार होती. मात्र, केंद्रातील सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी या योजनेस मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात 3.21 कोटी घरे बांधली गेली आहेत. अर्थातच कोट्यावधी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.

Tejas B Shelar
Published:
Pm Aawas Yojana

Pm Awas Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. ज्यांना हक्काचे घर नाहीये अशा लोकांसाठी सुद्धा केंद्रातील सरकारकडून एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 2015 साली पीएम आवास योजना सुरु केली आहे.

पीएम आवास योजना 2022 पर्यंतच सुरू राहणार होती. मात्र, केंद्रातील सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी या योजनेस मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात 3.21 कोटी घरे बांधली गेली आहेत.

अर्थातच कोट्यावधी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे. बेघर लोकांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर आले आहे. यामुळे या योजनेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान या योजनेची लोकप्रियता पाहता केंद्रातील सरकारने आता या योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी घर बांधण्यास मंजुरी दिली आहे.

जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आज आपण पीएम किसान योजनेच्या पात्रता आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तसेच यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पीएम आवास योजनेच्या पात्रता

पीएम आवास योजना नागरी म्हणजे शहरी व ग्रामीण अशा दोन भागात विभागण्यात आली आहे. या योजनेसाठी फक्त भारतीय नागरिक पात्र राहणार आहेत. सरकारी नोकरीत असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जे लोक आयकर करत असतील त्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही. अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांच्या नावावर आधीच घर आहे अशा लोकांना याचा फायदा मिळत नाही.

म्हणजे याचा लाभ फक्त बेघर लोकांनाच मिळतो. शहरी भागात 18 लाख रुपयांपेक्षा कमी आणि ग्रामीण भागात सहा लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारे लोक यासाठी पात्र ठरणार आहेत. ज्यांना ईडब्ल्यूएस कोट्यातून घर हवे असेल त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असावे. आधी ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा लोकांना परत याचा लाभ मिळणार नाही.

कोण कोणती कागदपत्रे लागतात ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बीपीएल कार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साइझ फोटो, रहिवासी दाखला यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.

अर्ज कसा करायचा ?

पीएम आवास योजनेसाठी पात्र असणारे लोक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन या साठी अर्ज करू शकता. किंवा घरबसल्या देखील यासाठी अर्ज करता येणार आहे. तुम्हाला जर घरबसल्या ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर पीएम आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे.

या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला Pm Awas Yojana ऑनलाइन अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज ओपन होईल तो अर्ज तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.

यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. पण अर्ज सबमिट करण्याआधी तुम्ही भरलेला अर्ज बरोबर आहे की नाही हे चेक करून घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe