Pm Awas Yojana : स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. यासाठी प्रत्येक जण अहोरात्र काबाडकष्ट करतो. मात्र असे असले तरी अनेकांना घराचे स्वप्न काही पूर्ण करता येत नाही. अहोरात्र काबाड कष्ट करूनही घरासाठी लागणारा पैसा उभा करताना सर्वसामान्यांना मोठी अडचण येते. त्यामुळे आजही देशभरातील कित्येक लोक कच्च्या घरात राहतात.
मात्र याच बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना राबवल्या जात आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, नमो आवास योजना अशा विविध योजना राबवल्या जात आहेत.
या योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून देखील बेघर लोकांसाठी पीएम आवास योजना राबवली जाते. पीएम आवास योजनेअंतर्गत कच्च्या घरात राहणाऱ्या आणि बेघर लोकांना घरासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत लाखो लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ही योजना शहरी आणि ग्रामीण भागात राबवली जाते. ही योजना 2017 मध्ये सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत या योजनेने अनेकांना आपल्या हक्काचे घर मिळवून दिलेले आहे.
ही स्कीम केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी स्कीम आहे. मात्र अनेकांच्या माध्यमातून या योजनेचा एकाच कुटुंबातील दोन लोकांना लाभ मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पीएम आवास योजनेचे याबाबतचे नियम आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
Pm आवास योजनेचे नियम कसे आहेत?
नियमानुसार, ज्यांचे स्वतःचे घर नाही किंवा जे कच्चा घरात राहतात त्या लोकांना पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकाच घरातील दोन लोकांना याचा लाभ मिळू शकतो का? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जर एका कुटुंबातील दोन व्यक्ती एकत्र एकाच छताखाली राहत असतील तर त्यापैकी एकालाच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकतो.
कारण योजनेच्या नियमांतर्गत कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. जसे की वडील आणि मुलगा एकत्र राहत असतील तर पिता किंवा पुत्र यांच्यातील एकालाच लाभ मिळू शकतो.
परंतु, जर एकाच कुटुंबातील दोन लोक वेगळे राहत असतील आणि दोघांची शिधापत्रिका वेगवेगळी असेल तर अशा परिस्थितीत एकाच कुटुंबातील दोघांनाही लाभ मिळू शकतो. मात्र त्यासाठी आवश्यक इतर अटींचीही पूर्तता करावी लागणार आहे.