PM Awas Yojana : भारताची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र आजही आपल्या देशात असंख्य लोकांना स्वतःचे हक्काचे घर नाही.
यामुळे देशातील बेघर लोकांना हक्काचे घर मिळावे अनुषंगाने शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वेगवेगळ्या योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. पीएम आवास योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना असून ही योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक आहे.

ही योजना केंद्रातील मोदी सरकारने 2015 मध्ये सुरू केले आहे आणि अंतर्गत आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांना आपल्या हक्काचे घर मिळाले आहे. या योजनेतून लाखो गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा उपलब्ध झाला आहे.
खरे तर केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश सर्वांसाठी घरे मिळवून देणे हाच आहे. या योजनेतून देशभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील, तसेच निम्न आणि मध्यमवर्गीय नागरिकांना घर बांधण्यासाठी सरकारकडून मदत पुरवली जात आहे. या अंतर्गत घर बांधण्यासाठी तसेच घर खरेदीसाठी अनुदान दिलं जातं आहे.
पण ही योजना दोन भागांमध्ये विभागण्यात आली आहे. पीएम आवास योजना शहरी आणि पीएम आवास योजना ग्रामीण अशा दोन भागात या योजनेची विभागणी करण्यात आली आहे. वास्तविक ही योजना सुरू होऊन आता जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे पण आजही या योजनेच्या संदर्भात अनेक प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केले जातात.
अनेकांकडून एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ पीएम आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात का असा प्रश्न विचारला जातोय. म्हणून आज आपण या योजनेचे नियम थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम आवास योजनेचे नियम काय सांगतात?
पीएम आवास योजनेचा एका कुटुंबाला एकदाच लाभ मिळतो. इथे कुटुंब अर्थात पती, पत्नी आणि अविवाहित मुले असा होतो. तसेच या योजनेचा लाभ याआधीच कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतलेल्या नागरिकांनाच मिळतो. या योजनेच्या नियमानुसार याचा लाभ एका कुटुंबाला फक्त एकदाच घेता येतो.
याचाच अर्थ जर दोन सख्खे भाऊ एकाच घरात राहत असतील तर त्या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पण जर समजा दोन भाऊ असतील आणि ते स्वतंत्र कुटुंबात राहत असतील म्हणजे वेगळ्या घरी राहत असतील, आणि दोघांची पात्रता वेगळी असेल, तर दोघेही या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.
अशा प्रकरणात दोन सख्खे भाऊ सुद्धा स्वतंत्र अर्ज करू शकतात आणि दोघांनाही योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकतो तसेच हे या योजनेच्या नियमानुसार ग्राह्य धरले जाणार आहे.
एखाद्या कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची लग्नं झालेली असतील आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला असतील. त्यांचे उत्पन्न सुद्धा वेगळं असेल तर अशा परिस्थितीत दोघेही स्वतंत्रपणे या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील असा स्पष्ट नियम यात नमूद आहे.