पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत 50 हजाराची गुंतवणूक केल्यास 25 वर्षांनी किती रिटर्न मिळणार ? वाचा….

भारतात सुरक्षित गुंतवणुकीसाठी पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनेला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. ही सरकारची एक सुरक्षित योजना असून यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतो.

Published on -

Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. शेअर मार्केट मधील चढ उताराच्या काळात अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षित गुंतवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे.

खरेतर, सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजना तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. दरम्यान, देशातील सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार विविध बचत आणि गुंतवणूक योजना चालवित आहे.

यामधीलच एक लोकप्रिय गुंतवणूक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ज्याला आपण पीपीएफ म्हणतो. पीपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी एक अशी गुंतवणूक योजना आहे जी गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर देते. दरम्यान आज आपण पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे पीपीएफ योजना?

केंद्र सरकार सध्या पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के व्याज देत आहे. पीपीएफ खात्यास वर्षातून किमान एकदा पैसे जमा करावे लागतात. आपण इच्छित असल्यास, आपण एका वर्षात पीपीएफ खात्यात पूर्णपणे गुंतवणूक करू शकता किंवा आपण हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता.

पीपीएफ खात्यात एका वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये दरवर्षी दीड लाखांपेक्षा जास्तीची रक्कम गुंतवता येत नाही. खरेतर, पीपीएफ खाते 15 वर्षात परिपक्व होते.

परंतु आपण इच्छित असल्यास, फॉर्म भरून ही योजना पुढे आणखी पाच वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. कोणतेही पीपीएफ खाते 5-5 वर्षे करून पुढे 50 वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते. कोणत्याही बँकेत पीपीएफ खाते उघडले जाऊ शकते.

महत्त्वाची बाब अशी की, आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ खाते देखील उघडू शकता. आता आपण पीपीएफ योजनेत 50 हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार हे समजून घेऊयात.

50,000 च्या गुंतवणुकीतून किती फंड मिळणार

जर गुंतवणूकदारांनी पीपीएफ अकाउंट ओपन करून यामध्ये दरवर्षी 50 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर पंधरा वर्षानंतर म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळी 34 लाख 36 हजार पाच रुपये मिळणार आहेत.

यामध्ये 21 लाख 86 हजार 5 रुपये हे निव्वळ व्याज राहणार आहे आणि बारा लाख 50 हजार रुपये ही त्यांची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे.

या योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते पण यात गुंतवणूक सुरू केली तर पाच वर्षांच्या आधी पैसे काढता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे पाच वर्षानंतर पैसे काढता येत असले तरी ते किती काही विशिष्ट परिस्थितीमध्येच काढता येऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe