पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या एफडी मध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अनेकजण पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतात.

दरम्यान सर तुम्हीही तुमच्याकडील पैसा कुठे सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास करणार आहे.

कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी टाईम डिपॉझिट योजना राबवते.

पोस्ट ऑफिसच्या याच योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखले जाते. या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनेप्रमाणे असल्याने या टाईम डिपॉझिट योजनेला एफ डी योजना असे नाव मिळाले आहे.

दरम्यान आज आपण याच टाईम डिपॉझिट योजनेसंदर्भात माहिती पाहणार आहोत. पोस्टाच्या दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला किती रिटर्न मिळणार याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना ही एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्ष तसेच पाच वर्ष कालावधीसाठी असते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 6.9% पासून ते 7.5% दराने व्याज दिले जात आहे.

पोस्टाच्या एक वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9%, दोन वर्षाच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के,

तीन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10 % आणि पाच वर्ष कालावधीच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.50% दराने परतावा दिला जातोय.

2 वर्षांच्या टीडी योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार
पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत जर एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला सात टक्के या दराने मॅच्युरिटी वर म्हणजेच दोन वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर पाच लाख 74,440 मिळणार आहेत. अर्थातच 74 हजार 440 रुपये व्याज म्हणून दिले जाणार आहेत.