पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ! ‘या’ योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या काही महिन्यात होणार डबल

पोस्ट ऑफिस कडून मिळालेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.5% या दराने परतावा दिला जातो. या योजनेत एकल किंवा संयुक्त खाते ओपन करता येते. सिंगल किंवा जॉइंट अकाउंट ओपन करून यामध्ये गुंतवणूकदारांना पैसा गुंतवता येतो.

Tejas B Shelar
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये आणि बँकेच्या एफडी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक पोस्टाच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवतात. जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत पैसे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे.

कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराचे पैसे डबल होतात. आज आपण पोस्ट ऑफिस कडून चालवल्या जाणाऱ्या किसान विकास पत्र या योजनेबाबत माहिती पाहणार आहोत.

किसान विकास पत्र असे जरी या योजनेचे नाव असले तरी देखील या योजनेचा लाभ साऱ्यांना घेता येतो. ही पोस्ट ऑफिस ची एक सर्वात जुन्या योजनांपैकी एक असून यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.

कशी आहे किसान विकास पत्र योजना?

पोस्ट ऑफिस कडून मिळालेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.5% या दराने परतावा दिला जातो. या योजनेत एकल किंवा संयुक्त खाते ओपन करता येते. सिंगल किंवा जॉइंट अकाउंट ओपन करून यामध्ये गुंतवणूकदारांना पैसा गुंतवता येतो.

या योजनेची सर्वात मोठी विशेषता या मुद्दे गुंतवणूकदारांना त्यांना हवे तेवढे पैसे गुंतवता येतात. दहा वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांच्या नावाने या योजनेत अकाउंट ओपन करता येते.

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या व्याजदरात प्रत्येक तीन महिन्यांनी बदल होतो. या योजनेत कितीही अकाउंट ओपन करता येतात. या योजनेत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

या योजनेत केलेली गुंतवणूक 115 महिन्यात डबल होते. अर्थातच या योजनेत अकाउंट ओपन करून जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच लाख रुपये गुंतवले तर 115 महिन्यांनी ते पाच लाख रुपये थेट दहा लाख रुपये होतील.

अर्थातच या गुंतवणुकीवर सदर गुंतवणूकदाराला पाच लाख रुपयांचे निव्वळ व्याज मिळणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही योजना विशेष फायद्याची ठरत असून अनेक गुंतवणूकदारांनी यामध्ये आपला पैसा ओतला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एखाद्या योजनेत पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर या योजनेत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe