पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आहे कुबेरचा खजाना ! 5 वर्षासाठी 11 लाख रुपये गुंतवले तर मिळणार इतके रिटर्न, वाचा….

तुम्हीही येत्या काही दिवसांनी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत ज्याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखतात.

Tejas B Shelar
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही भारतात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना आणि बँकांच्या एफडी योजनांना पसंती मिळते. कारण म्हणजे यात गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित असतो. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांना सरकारची गॅरंटी असते.

दरम्यान, जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत ज्याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखतात.

पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ही एक वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची आणि पाच वर्षांची आहे. आता आपण टाईम डिपॉझिट योजनेचे व्याजदर कसे आहेत याबाबत माहिती पाहुयात.

व्याजदर कसे आहेत?

एक वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सात टक्के दराने, तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.10 टक्क्याने आणि पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.50% दराने परतावा दिला जातो.

आता आपण पोस्टाच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत 11 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळू शकतात याबाबतची माहिती पाहूयात.

अकरा लाखांची गुंतवणूक केल्यास मिळणार इतके रिटर्न

पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत सध्या 7.50% दराने परतावा मिळतोय. जर समजा या योजनेत एखाद्या ग्राहकाने 11 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सदर ग्राहकाला पंधरा लाख 93 हजार 127 रुपये मिळणार आहेत.

अर्थातच पाच वर्षांच्या कालावधीत सदर गुंतवणूकदाराला चार लाख 93 हजार 127 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.

पण गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसा गुंतवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यातुन जर गुंतवणूकदारांना चाळीस हजार रुपयांपेक्षा अधिकचे व्याज मिळाले तर त्यावर दहा टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंतचा टीडीएस द्यावा लागणार आहे.

जे लोक पॅन देतील त्यांना दहा टक्के टीडीएस द्यावा लागतो आणि जे लोक पॅन कार्ड देत नाहीत त्यांना 20% टीडीएस द्यावा लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe