मोठी बातमी ! पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाचे लवकरच भूमिपूजन होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा मार्ग अंशतः खुला झाला आहे. मात्र लवकरच हा पूर्ण मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरु होणार आहे. या मार्गाला पर्पल लाईन म्हणून ओळखले जाते आणि याच पर्पल लाईनवरील सिविल कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या शेवटच्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Metro News

Pune Metro News : पुणे, नागपूर, मुंबई या महाराष्ट्रातील तिन्ही शहरांमध्ये मेट्रो सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, सार्वजनिक वाहतुकीचा एक जलद पर्याय सर्वसामान्यांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी मेट्रोची पायाभरणी करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे सध्या या तिन्ही शहरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. हेच कारण आहे की या तिन्ही शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पुण्याबाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी हे दोन महत्त्वाचे मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.

अर्थातच पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा मार्ग अंशतः खुला झाला आहे. मात्र लवकरच हा पूर्ण मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरु होणार आहे. या मार्गाला पर्पल लाईन म्हणून ओळखले जाते आणि याच पर्पल लाईनवरील सिविल कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या शेवटच्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

हा संपूर्ण भूमिगत मार्ग असून या मार्गासाठी काही तांत्रिक परवानग्या घेणे बाकी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.

स्वतः खासदार अन सहकार व नागरी हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीचं माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी नुकताच या मार्गाचा नुकताच आढावा घेतला.

यावेळी मोहोळ म्हणालेत की, काही स्थापत्यविषयक कामे पूर्ण केल्यानंतर आणि तांत्रिक परवानग्या मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांतच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रोमार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल.

हा मार्ग सहा किलोमीटर लांबीचा असून या मार्गावरील कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे लवकरच या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. तसेच ज्यावेळी या मार्गाचे उद्घाटन होईल त्यावेळी केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचेही भूमिपूजन केले जाणार आहे.

याशिवाय, वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रोमार्गासाठी आवश्यक परवानग्या मिळवून लवकरात लवकर त्यांचेही काम सुरू केले जाणार असे मोहोळ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत नजीकच्या भविष्यात पुण्यातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारले जाणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास सध्याच्या तुलनेत आणखी सुपरफास्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe