मोठी बातमी ! आता पुण्याचा ‘हा’ भागही मेट्रोने जोडला जाणार, DPR तयार करण्याचे काम सुरू

येत्या काही दिवसांनी या मार्गाचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर हा डीपीआर मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला जाणार आहे. याला मंजुरी मिळाली की त्यानंतर या मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. महा-मेट्रोचे एमडी श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावित मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम महा-मेट्रोने सुरू केल्याचे सांगितले आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण या मार्गावरही भविष्यात मेट्रो धावणार आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे या मार्गांचा विस्तारही केला जात आहे. अशातच आता मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण यादरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांनी या मार्गाचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर हा डीपीआर मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला जाणार आहे. याला मंजुरी मिळाली की त्यानंतर या मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

महा-मेट्रोचे एमडी श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावित मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम महा-मेट्रोने सुरू केल्याचे सांगितले आहे.

याशिवाय स्वारगेट ते कात्रज पर्यंत पुणे मेट्रो लाईन 1 च्या विस्तारासाठीची निविदा प्रक्रिया सुद्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे, म्हणून आता लवकरच या मेट्रो मार्गाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे.

हा मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका ते कात्रज पर्यंत मेट्रो ने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या मेट्रो मार्गामुळे कात्रज व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे मेट्रोच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे.

पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुण्यातील मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार आहे. आधी पुण्यातील मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत चालवली जात होती.

मात्र आता हा कालावधी एक तासाने वाढवण्यात आला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मेट्रोची वेळ एक तासाने वाढवण्यात आली असल्याचे महा मेट्रोच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत सुरु असायची. परंतु आता ही सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे.

यामुळे आता मेट्रो गाड्यांमधील मध्यांतर एक मिनिटाने कमी होईल. म्हणजे आता सात मिनिटांऐवजी मेट्रो गाड्या सहा मिनिटांच्या अंतराने धावतील. यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याने नागरिकांच्या माध्यमातून मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe