पुणेकर इकडे लक्ष द्या ! मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय

सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी हे 2 मेट्रो मार्ग सुरू आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा वनाज ते रामवाडी या मार्गाचा बाकी राहिलेला टप्पा वाहतुकीसाठी दाखल झाला होता.

Tejas B Shelar
Updated:
Pune Metro News

Pune Metro News : गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील वाहतूक कोंडी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर पुण्यात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढत आहे. पण ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मेट्रोचे हे जाळे आणखी वाढवले जात आहे. यासाठी सध्याच्या मेट्रोमार्गांचा विस्तार केला जात आहे तसेच नवीन मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित करण्यात आले आहेत.

सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी हे 2 मेट्रो मार्ग सुरू आहेत.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा वनाज ते रामवाडी या मार्गाचा बाकी राहिलेला टप्पा वाहतुकीसाठी दाखल झाला होता. मात्र हा संपूर्ण टप्पा वाहतुकीसाठी दाखल होत असतानाच येरवडा मेट्रोस्थानाकाचे काम अपूर्ण असल्याने हे स्थानक वाहतूक सेवेत दाखल झाले नव्हते.

पण आता हे रेल्वे स्थानक काल अर्थातच बुधवारपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान याप्रसंगी पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रो संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवेच्या फेऱ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आधी या दोन्ही मार्गांवर सकाळी व सायंकाळी जास्त गर्दी असण्याऱ्या वेळेत प्रत्येक साडेसात मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होत असे.

सकाळी ८ ते ११ व दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची वारंवारिता ७.५ मिनिट होती. पण आता ही वारंवारिता ७ मिनिटे करण्यात आली आहे. म्हणजे आता प्रवाशांसाठी दर ७ मिनिटाला मेट्रो उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गावर 113 ऐवजी 117 मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत. तसेच वनाज ते रामवाडी या मार्गावर 114 ऐवजी 118 मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत.

साहजिकच या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होईल अशी आशा देखील व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe