पुणे शहरात तयार होणार ‘हे’ सात नवीन मेट्रो मार्ग, कसे असणार विस्तारित मेट्रो मार्गांचे रूट ?

पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे. पीसीएमसी म्हणजेच पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडीपर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गाच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

Tejas B Shelar
Updated:
Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महा मेट्रोच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. या मेट्रो मार्गांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय. दुसरीकडे या दोन्ही मेट्रो मार्गांचा विस्तार करण्याचे देखील नियोजन आहे.

यातील पहिल्या फेजच्या विस्ताराचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे. पीसीएमसी म्हणजेच पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडीपर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे.

टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गाच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच पहिल्या फेजमधील स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाची टेंडर प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात प्रत्यक्षात कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक होणार आहे आणि त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होणार आहे.

दुसऱ्या फेज बाबत म्हणजेच वनाजी ते रामवाडी या मार्गाच्या विस्ताराबाबत बोलायचं झालं तर या दुसऱ्या फेजच्या विस्तारात सात नवीन मेट्रो मार्ग तयार होणार आहेत. पुणे मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी टप्पा II मध्ये नेटवर्कची पोहोच वाढवण्यासाठी डिझाइन केलेल्या सात नवीन मार्गांचा समावेश आहे. या मार्गांचे उद्दिष्ट अधिकाधिक अतिपरिचित क्षेत्रे जोडणे आणि पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करणे हेच राहणार आहे.

केंद्र सरकारकडून मान्यता प्रलंबित मार्ग

1. वनाज ते चांदणी चौक : हा मार्ग 1.2 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर दोन स्थानक विकसित होणार आहेत.

2. रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी : हा 11.63 किलोमीटर लांबीचा मार्ग असून यावर 11 स्थानके राहतील.

3. खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी : हा मेट्रो मार्ग 25.66 किलोमीटर लांबीचा राहणार असून या मार्गावर एकूण 22 स्थानके विकसित केले जाणार आहेत.

4. SNDT-वारजे-माणिकबाग : हा 6.12 किलोमीटर लांबीचा मार्ग राहील आणि यावर सहा स्थानके तयार होतील.

PMC ची मंजुरी बाकी असणारे दोन मार्ग

5. हडपसर ते लोणी काळभोर : हा मेट्रो मार्ग 11.35 किलोमीटर लांबीचा राहणार असून या मार्गावर एकूण 10 स्थानके विकसित होणार आहेत.

6. हडपसर ते सासवड : हा मेट्रो मार्ग ५.५७ किलोमीटर लांबीचा राहणार आणि यावर चार मेट्रो स्थानके विकसित केली जाणार आहेत.

अभ्यासाधीन मार्ग

7. भविष्यात निगडी – मुक्ताई चौक – वाकड – नाशिक फाटा – चाकण असा मेट्रो मार्ग तयार होणार असून या महत्त्वाकांक्षी नवीन मार्गासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. जेव्हा या मार्गाचा डीपीआर तयार होईल तेव्हा या मार्गावर किती स्थानके राहतील आणि या मार्गाचे प्रत्यक्षात लांबी किती असेल याबाबत योग्य ती माहिती समोर येऊ शकणार आहे. पुण्यातील औद्योगिक आणि निवासी केंद्रांमधील वाढत्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करणे हा या मार्गाचा उद्देश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe