आनंदाची बातमी ! पुण्यातील ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग लवकरच सुरु होणार, पुढील आठवड्यात सुरू होणार अंतिम चाचणी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. अर्थातच सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग अंशतः वाहतुकीसाठी सुरू आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Metro News

Pune Metro News : पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षापासून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रो सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे शहरात दोन मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. अर्थातच सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग अंशतः वाहतुकीसाठी सुरू आहे.

यामुळे, पुणेकरांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सिविल कोर्ट ते स्वारगेट हा पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा अर्थातच पर्पल मेट्रो लाईनचा बाकी राहिलेला टप्पा वाहतुकीसाठी कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याच मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.

कधी सुरू होणार सिविल कोर्ट – स्वारगेट मेट्रो मार्ग?

सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानचा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. यासाठी सध्या प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. हा मार्ग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली अंतिम सुरक्षेची (सेफ्टी) चाचणी (सीआरएमएस) लवकरच घेतली जाणार आहे.

पुढील आठवड्यात यासाठी दिल्लीवरून अधिकारी येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे ही अंतिम चाचणी पूर्ण झाल्यानंतरचं या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की याचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर यावर प्रत्यक्षात मेट्रो चालवून चाचणी देखील घेण्यात आली होती. तसेच, ही चाचणी यशस्वी सुद्धा झाली आहे.

मात्र हा मेट्रो मार्ग सुरू करण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षेची खातर जमा केली जाणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात म्हणजेच सप्टेंबरच्या अगदी सुरुवातीलाच सीआरएमएसचे (कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी) पथक दिल्लीतून पुण्यात येणार आहे.

हे पथक येथील कामकाजाची, सुरक्षेची व कार्यक्षमतेची पाहणी करणार आहे. मग ही पाहणी पूर्ण झाली की येथील मेट्रो सेवा सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.

अर्थातच सिविल कोर्ट ते स्वारगेट हा संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर पुणेकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe