Pune New Tunnel : पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही शहरात अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) शहरात एक नवीन बोगदा विकसित केला जाणार आहे. हा नवीन बोगदा सुमारे वीस किलोमीटर लांबीचा राहणार असून यामुळे येरवडा ते कात्रज हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून येरवडा ते कात्रज या सुमारे 20 किमी लांबीच्या बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे.
कसा असणार नवा प्रकल्प?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणाऱ्या ट्विन टनेलची निर्मिती केली जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की शहरातील या प्रकल्पासाठी प्रारूप व्यवहार्यता अहवाल (PFR) तयार करण्यासाठी निविदा सुद्धा मागविण्यात आल्या होत्या.
दरम्यान आता या प्रकल्पासाठी तीन कंपन्यांनी निविदा सुद्धा भरल्या असून, त्यापैकी एका कंपनीला अहवाल तयार करण्याचे काम दिले जाणार अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
या प्रकल्पाचा डीपीआर कधी तयार होणार?
दरम्यान प्रारूप व्यवहार्यता अहवाल तयार झाल्यानंतर मग याचा डीपीआर तयार होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर म्हणजेच सर्वंकष प्रकल्प अहवाल येत्या काही दिवसांनी तयार केला जाणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांकडून देण्यात आली आहे.
या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर राजधानी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.
दरम्यान आता या प्रकल्पाचा प्रारुप व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी निविदा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ट्विन टनेल विकसित करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
हा जुळा बोगदा शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे, यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार आहे.
या बोगद्याच्या सुरुवातीचा आणि शेवटचा पॉईंट तसेच या प्रकल्पाचा अंदाजित खर्च हा डीपीआरनंतर निश्चित केला जाणार अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.