पुणेकरांसाठी गुड न्यूज ! शहरातील ‘या’ भागात विकसित होणार डबल डेकर ट्विन बोगदा, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रस्ते आणि रेल्वे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग बनवले जात आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी शहरात एक नवा बोगदा तयार केला जाणार असून ही प्रस्तावित करण्यात आलेली टनेल डबल डेकर ट्विन टनेल राहणार आहे. या नव्या बोगद्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. हा नवा बोगदा येरवडा ते कात्रज दरम्यान तयार होणार आहे.

Published on -

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे PMRDA कडून शहरात 20 किलोमीटर लांबीचा डबल डेकर ट्विन बोगदा तयार केला जाणार आहे. हा बोगदा येरवडा ते कात्रजदरम्यान असेल अन या 20 किमी लांबीच्या बोगदा प्रकल्पाबाबत आता एक नवीन अपडेट हाती आली आहे.

खरे तर या प्रकल्पामुळे येरवडा ते कात्रज दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. या भागात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते पण हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाल निघणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या वीस किलोमीटर लांबीच्या येरवडा ते कात्रज दरम्यानच्या बोगदा मार्ग प्रकल्पाबाबत काय नवीन अपडेट समोर आली आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहेत डिटेल्स?

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा ते कात्रज दरम्यान वीस किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाणार असून या प्रकल्पासाठीची फिजिबिलिटी स्टडी अर्थातच व्यवहार्यता अभ्यास सुरु झाला आहे. एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा बोगदा शहरातील प्रमुख वाहतूक प्रवाह वळवणार आहे.

यामुळे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात राहणार आहे. खरे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि PMRDA मिळून तातडीच्या उपाययोजना राबवत आहे.

तसेच या भीषण समस्यावर रामबाण उपाय सुद्धा तयार केले जात आहेत, वाहतूक कोंडी कायमची दूर व्हावी यासाठी दीर्घकालीन उपाय आखले जात आहेत. दरम्यान, PMRDAच्या अधिकाऱ्यांनी या बोगदा प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना असे सांगितले की, हा बोगदा अशा वाहनांसाठी असेल जे पुण्यातून दुसऱ्या भागाकडे प्रवास करत आहेत.

त्यामुळे शहराच्या आतील रस्त्यांवरील ताण कमी होईल. यामुळे शहरांतर्गत होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचं झालं तर या बोगद्यामध्ये विविध एस्केप रूट्स असतील जे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानानुसार बाहेर पडण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

हा बोगदा पूर्णपणे विकसित झाल्यानंतर नगर रोड, आळंदी रोड आणि नाशिक रोड येथून येणारी वाहतूक थेट दक्षिण महाराष्ट्राकडे वळवली जाईल. दरम्यान, या प्रकल्पासाठी वाहतूक सर्वेक्षण, पर्यावरण व सामाजिक परिणाम अभ्यास, जमीन अधिग्रहण, सार्वजनिक सल्लामसलत, आणि PPP मॉडेलचा विचार केला जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

एकंदरीत या प्रकल्पाच्या कामासाठी आता तीव्र हालचाली सुरू झाल्या आहेत, यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News