पुण्याजवळील ‘या’ शहरात तयार होणार नवा रिंग रोड ! CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Published on -

Pune News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. नाशिक पाठोपाठ आता पुण्याजवळील आणखी एका महत्त्वाच्या शहरात रिंग रोड उभारला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण फारच वाढले आहेत. पुण्यासारखीच परिस्थिती श्रीक्षेत्र आळंदी येथे सुद्धा पाहायला मिळते. श्रीक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी देशभरातील भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

आळंदी येथे येणाऱ्या भाविकांमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची सुद्धा समस्या भेडसावंत आहे. दरम्यान श्रीक्षेत्र आळंदी येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी आता महायुती सरकार ॲक्शन मोडवर आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीला पुण्याप्रमाणेच रिंग रोड ची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. आळंदीतील वाहतूक कोंडीची समस्या ही पुण्यापेक्षा भीषण आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता उपायोजना केल्या जाणार आहेत.

श्रीक्षेत्र आळंदी येथे बायपास वर्तुळाकार मार्ग म्हणजे रिंग रोडची निर्मिती होणार आहे. येथील वाहतुकीचे संचलन व्यवस्थित झाले तर वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे आणि त्यासाठी आळंदीला बायपास वर्तुळाकर मार्ग (रिंगरोड) केला जाणार अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यासाठीचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचीही माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे. आळंदीच्या रिंग रोड साठी 58 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान या रिंग रोडच्या माध्यमातून आळंदीतील वाहतुकीची कोंडी सोडवता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

आळंदी नगरपरिषदेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी मध्ये आले होते. यावेळी फडणवीस यांची एक जंगी सभा झाली. या सभेवेळी बोलताना मुख्यमंत्री महोदयांनी आळंदीच्या रिंग रोडची माहिती दिली.

नक्कीच आळंदी मध्ये रिंग रोड तयार झाला तर याचा आळंदीवासियांना मोठा फायदा होणार आहे आणि येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास देखील यामुळे अधिक जलद आणि सुरक्षित होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe