पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! दिवाळीच्या काळात पुण्याहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार अतिरिक्त बसेस

पुण्यातील नागरिकांसाठी एसटी महामंडळ अतिरिक्त बसेस चालवणार आहे. खरे तर पुण्याहून विदर्भात जाणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. सणासुदीच्या काळात विशेषता दिवाळीच्या काळात ही संख्या आणखी वाढत असते. याचमुळे एसटी महामंडळाच्या माध्यमातून पुणे ते विदर्भातील अमरावती दरम्यान आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार आहेत.

Tejas B Shelar
Updated:
Pune News

Pune News : येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा आनंददायी पर्व साजरा केला जाणार आहे. दरम्यान याच सणासुदीच्या अन सुट्टीच्या काळात आपल्या मूळ गावाकडे परतणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

पुण्यातील नागरिकांसाठी एसटी महामंडळ अतिरिक्त बसेस चालवणार आहे. खरे तर पुण्याहून विदर्भात जाणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. सणासुदीच्या काळात विशेषता दिवाळीच्या काळात ही संख्या आणखी वाढत असते.

याचमुळे एसटी महामंडळाच्या माध्यमातून पुणे ते विदर्भातील अमरावती दरम्यान आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार आहेत.

आता आपण पुणे ते अमरावती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या अतिरिक्त गाड्यांचे वेळापत्रक नेमके कसे राहणार, या दोन्ही शहरा दरम्यान किती अतिरिक्त बसेस चालवल्या जातील या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

किती अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार

खरे तर दरवर्षी पुणे ते अमरावती दरम्यान अतिरिक्त बसेसं चालवल्या जात असतात. गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या दिवाळीच्या काळात पुणे ते अमरावती 45 बसेस चालवल्या गेल्या होत्या म्हणजेच गेल्यावर्षी या मार्गावर पुणे ते अमरावती आणि अमरावती ते पुणे अशा अतिरिक्त 90 फेऱ्या झाल्या होत्या.

यंदा मात्र प्रवाशांची संख्या पाहता या मार्गावर 50 अतिरिक्त बसे चालवल्या जाणार आहेत. म्हणजेच पुणे ते अमरावती अशी आपण आणि अमरावती ते पुणे अशा 50 फेऱ्या होणार आहेत. अर्थातच या मार्गावर दोन्ही दिशेने 100 फेऱ्या होणार आहेत.

यामुळे पुणे ते अमरावती दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. जर तुम्ही ही दिवाळीच्या काळात पुणे ते अमरावती यादरम्यान प्रवास करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एसटी महामंडळाचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

पुणे येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान खडकी येथून २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान 50 बसेस अमरावतीकरीता रवाना होणार आहे. तर अमरावती येथुन ३ ते १० नोव्हेंबर पर्यंत पुणे करीता ५० बसेस सोडल्या जाणार आहेत.

एवढेच नाही तर यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर, वाशिम या विदर्भातील शहरांसाठी देखील प्रवाशांची संख्या पाहून अतिरिक्त बसेस चालवण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून आखले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe