Pune News : एकीकडे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील नव्या विमानतळ प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 30 सप्टेंबर 2025 रोजी उद्घाटन होईल अशी एक माहिती समोर आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली असून याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुसरीकडे आता पुण्यातील पुरंदर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे.

खरे तर पुरंदर विमानतळ प्रकल्पाला मध्यंतरी चांगलाच ब्रेक लागला होता मात्र आता गेल्या अनेक काळापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने आता औपचारिक नुकसानभरपाईचे पॅकेज जाहीर केले आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना किती मोबदला मिळणार याबाबत माहिती समोर आली आहे. त्याचा परिणाम म्हणून आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस वेग येणार आहे.
शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार?
पुरंदर विमानतळ प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चार पट आर्थिक नुकसानभरपाई देण्यात येणार अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जे शेतकरी स्वतःहून प्रकल्पासाठी जमिनी देतील,
जमिनीच्या भूसंपादनासाठी संमती देतील, त्यांना विमानतळालगतच्या ‘एअरोसिटी’ भागात दहा टक्के जमीन सुद्धा दिले जाणार आहे. या भागातील जवळपास 700 एकर जमिनीमधून दहा टक्के पर्यायी जमीन बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की ही जमीन ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व’ या तत्त्वावर दिली जाईल असे म्हटले जात आहे. तसेच भूसंपादनासाठीचे संमतीपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया आजपासून अर्थात 21 जुलै 2025 पासून सुरु करण्यात आली आहे.
जमीन अधिग्रहण लवकरात होणार पूर्ण
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या जवळपास 82 टक्के जमीन मालकांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे आणि यामुळेच या प्रकल्पासाठीचे जमीन अधिग्रहण लवकरात लवकर संपन्न होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीस सरकारने 2025 च्या शेवटी या प्रकल्पासाठीचे भूसंपादन पूर्ण व्हावे आणि 2026 च्या मध्यापर्यंत या प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू व्हावे या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले असे.
या भव्य विमानतळाबाबत बोलायचं झालं तर या प्रस्तावित विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या 4000×60 मीटर या आकारमानाच्या राहणार आहेत. हे विमानतळ फक्त पुणेच नव्हे, तर पश्चिम व मध्य महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असा विश्वास देखील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.