अहमदनगर, पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ दिवशी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक ?

दरवर्षी पुण्याहून धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूरला जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक असते. यामुळे रेल्वे विभागाने पुण्याहून एक विशेष रेल्वे धावणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेने पुणे-नागपूर विशेष रेल्वे चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Railway News

Pune Railway News : राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील अर्थातच पुण्यातील आणि सहकाराची पंढरी म्हणून ख्यातनाम असणाऱ्या अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे अन नगर शहरातील रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने एक मोठी भेट दिली आहे.

खरंतर, धम्मचक्र प्रवर्तन दिनी उपराजधानी नागपूर येथे दरवर्षी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावरून नागपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

दरवर्षी पुण्याहून धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूरला जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक असते. यामुळे रेल्वे विभागाने पुण्याहून एक विशेष रेल्वे धावणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेने पुणे-नागपूर विशेष रेल्वे चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक?

या मार्गावर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर गाडी क्रमांक (०१२१६) ही विशेष एक्सप्रेस ट्रेन पुण्याहून ११ ऑक्टोबरला सोडली जाणार आहे. 11 ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून ही विशेष गाडी चालवली जाणार आहे.

11 ऑक्टोबरला दुपारी चार वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून ही गाडी रवाना झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी नागपूरला पोहचणार आहे.

तसेच, गाडी क्रमांक (०१२१५) नागपूरहून १२ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता सोडली जाणार आहे अन ही ट्रेन पुण्याला दुसऱ्यादिवशी रात्री ८ वाजता पोहचणार आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?

या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नंदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर व दौंड कॉर्ड लाईन आदी स्थानकांवर थांबा दिला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe