Pune Solapur Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही राज्यात अनेक मोठ मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच पुणे सोलापूर महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास जलद होईल अशी आशा आहे.
कारण की या राष्ट्रीय महामार्गावर तीन नवीन उड्डाणपूल तयार होणार आहेत. तसेच दोन ठिकाणी सर्विस रोड देखील तयार केले जाणार आहेत. खरेतर या मार्गावर अर्जुनसोंड व अनगर पाटी या दोन ठिकाणी उड्डाणपूल व सर्व्हिस रोड तयार केला जात आहे.
दुसरीकडे सावळेश्वर पाटीजवळ देखील एक उड्डाणपूल प्रस्तावित असून त्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर याचेही काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. म्हणजेच या महामार्गावर तीन नवे उड्डाणपूल तयार होतील आणि यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणातील असा विश्वास व्यक्त होतोय.
सध्या या मार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि यामुळे अपघातांची देखील संख्या वाढलीये. हेच कारण आहे की या राष्ट्रीय महामार्गावर तीन नवे उड्डाणपूल तयार होणार आहेत. सध्या जे दोन उड्डाणपूल तयार केले जात आहेत म्हणजेच अर्जुनसोंड व अनगरजवळ जे उड्डाणपूल बांधले जात आहेत त्यासाठी ६४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही उड्डाणपुलांचे काम एका वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन देखील आहे. या महामार्गावर अर्जुनसोंडजवळ उड्डाणपूल तयार होणार असून याचे काम सुरू आहे. हा पूल लांबोटी (चंदनगर) पुलापासून काही अंतरापर्यंत असणार आहे.
या उड्डाण पुलाच्या कामासाठी साधारणत: १९ कोटी रुपयांचा खर्च होणार असा अंदाज असून याचे काम येत्या एका वर्षात पूर्ण केले जाईल असा दावा करण्यात आला आहे. तसेच अनगर पाटीजवळील उड्डाणपुलासाठी ४५ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याचेही काम डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण होणार असे प्राधिकरणाकडून सांगितले गेले आहे.
शिवाय या राष्ट्रीय महामार्गावर जो तिसरा उड्डाणपूल प्रस्तावित आहे तो सावळेश्वरजवळील उड्डाणपुल ३० कोटींचा खर्च करून तयार केला जाईल आणि याच्या मंजुरीचा प्रस्ताव हा प्राधिकरणाला पाठवण्यात आला आहे.
येत्या काही दिवसांनी या प्रस्तावाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर याचेही काम सुरू होणार आहे. नक्कीच हे 3 उड्डाणपूल तयार झाल्यानंतर या राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर होईल आणि पुणे ते सोलापूरदरम्याचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.