रतन टाटा यांची 15 हजार कोटींची संपत्ती नेमकी कुणाला? मृत्युपत्रातल्या त्या तरतुदीमुळे नवीन वाद ?

देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्याची, टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी, टाटा सन्समध्ये रतन टाटा यांचा ०.८३% हिस्सा होता. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ नुसार, रतन टाटांची एकूण संपत्ती सुमारे ७,९०० कोटी रुपये होती. आरटीईएफकडे टाटा डिजिटल आणि टाटा टेक्नॉलॉजीजमध्येही लहान हिस्सेदारी आहे.

Tejas B Shelar
Published:

Ratan Tata News : भारतातील जेष्ठ उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी जगाला निरोप दिला, यामुळे भारताच्या उद्योग जगतात मोठी शोककळा पसरली. उद्योग जगतासहित सर्वच क्षेत्रातून रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला. मात्र दिवंगत रतन टाटा आपल्यात हयात नसले तरीही त्यांचे कार्य हे अजरामर राहणारे आहे.

त्यांच्या कार्यासोबतच त्यांनी बांधलेल्या संस्थान देखील लोकांच्या आठवणीत कायम राहणारी आहेत. मात्र आता रतन टाटा यांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कारण त्यांनी स्थापन केलेल्या रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन (RTEF) या संस्थेबद्दल काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा रतन टाटा यांचे नाव चर्चेत आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रतन टाटा यांनी २०२२ मध्ये समाजसेवेसाठी दोन संस्था स्थापन केल्या होत्या. ज्या त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून चालवल्या जातील. यामध्ये आरटीईएफ आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट यांचा समावेश आहे. यापैकी, RTEF ची स्थापना कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत करण्यात आली.

देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्याची, टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी, टाटा सन्समध्ये रतन टाटा यांचा ०.८३% हिस्सा होता. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ नुसार, रतन टाटांची एकूण संपत्ती सुमारे ७,९०० कोटी रुपये होती. आरटीईएफकडे टाटा डिजिटल आणि टाटा टेक्नॉलॉजीजमध्येही लहान हिस्सेदारी आहे.

खरेतर, टाटा यांच्या दूरदृष्टीतून स्थापित झालेले हे फाउंडेशन समाजसेवेसाठी स्थापित करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे फाउंडेशन त्यांच्या वैयक्तिक पैशातून चालवले जाईल, जे सामाजिक सेवेच्या कामासाठी वापरले जाईल, असे सुद्धा रतन टाटा यांनी ठरवले होते.

परंतु आता टाटा गेल्यानंतर या फाउंडेशनच्या संदर्भात एक मोठा यक्षप्रश्न उभा झाला आहे. कारण RTEF चे विश्वस्त कोण निवडणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दिवंगत रतन टाटा यांनी आपले एक आदर्श मृत्युपत्र बनवले होते. पण, त्यांच्या मृत्युपत्रात या संदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत.

मात्र, लवकरच या फाउंडेशनचे विश्वस्त कोण असणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुपशी संबंधित लोक यासाठी निष्पक्ष व्यक्तीची मदत घेणार असल्याच्या चर्चा सध्या मीडिया रिपोर्टमध्ये सुरू आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांना मध्यस्थ बनवले जाऊ शकते असा मोठा दावा देखील करण्यात आला आहे.

दरम्यान हेच मुख्य न्यायाधीश टाटांच्या इच्छेची अंमलबजावणी करणारे लोक, टाटा कुटुंब की टाटा ट्रस्टचे सदस्य यांपैकी एकाला या फाउंडेशनचे विश्वस्त म्हणून निवडतील. म्हणून आता या फाउंडेशनचे विश्वस्त नेमकं कोण राहणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रतन टाटा यांच्याकडे 15000 कोटी रुपयांपेक्षा अधिक ची संपत्ती होती.

दिवंगत टाटा यांना आपली बहुतांशी संपत्ती ही समाजकार्यासाठी गुंतवायची होती. म्हणून दिवंगत टाटा यांच्या बहुतेक मालमत्तेचे व्यवस्थापन आरटीईएफ करेल. तर उर्वरित मालमत्ता एका ट्रस्टद्वारे पाहिली जाईल. रतन टाटा यांच्याकडे अनेक गाड्या होत्या, ज्यात एक फरारी आणि एक मासेराती होती.

आता या गाड्यांचा सुद्धा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारे पैसे आरटीईएफला जातील अशा चर्चा सुद्धा सध्या सुरू आहेत. यामुळे दिवंगत रतन टाटा यांच्या मृत्यूच्या पक्षात त्यांच्या संपत्तीचे नेमके काय होणार, या संपत्तीचा समाजकार्यासाठी कशा पद्धतीने उपयोग होणार या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe