एसबीआयचा मोठा निर्णय ! शैक्षणिक कर्जाची रक्कम 50 लाख रुपयांपर्यंत वाढवली, कोणाला मिळणार लाभ ? वाचा…..

स्टेट बँक ऑफ इंडिया प्रदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. यासाठी बँकेकडून एक विशेष योजना राबवली जात आहे. SBI Global Ed-Vantage हा एसबीआय चा एक उत्कृष्ट पर्याय आहे. या अंतर्गत विदेशात शिक्षण घेणाऱ्यांना कर्ज मिळते.

Tejas B Shelar
Published:
SBI Educational Loan

SBI Educational Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज ऑफर करते. होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन अशा विविध प्रकारचे कर्ज एसबीआय कडून ऑफर केले जाते. एसबीआयच्या एज्युकेशनल म्हणजेच शैक्षणिक कर्जाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येत आहे.

पैशांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, पैशांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येऊ नये हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते. महत्त्वाची बाब म्हणजे एसबीआय कडून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लाखो रुपयांचे कर्ज दिले जात आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया प्रदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. यासाठी बँकेकडून एक विशेष योजना राबवली जात आहे. SBI Global Ed-Vantage हा एसबीआय चा एक उत्कृष्ट पर्याय आहे.

या अंतर्गत विदेशात शिक्षण घेणाऱ्यांना कर्ज मिळते. या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या तारणमुक्त कर्जाची मर्यादा बँकेने नुकतीच वाढवली असून आज आपण एसबीआयच्या याच पर्यायाची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआय ग्लोबल एड-व्हँटेज नेमके काय आहे?

एसबीआय बँकेचा ग्लोबल एड-व्हँटेज हा एक शैक्षणिक कर्जाचा पर्याय आहे. या अंतर्गत परदेशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

कोणतेही तारण न देता विद्यार्थ्यांना या अंतर्गत कमाल 50 लाखांचे कर्ज मिळते. हे कर्ज परतफेड करण्यासाठी विद्यार्थ्यांना पंधरा वर्षांचा कालावधी सुद्धा मिळतो. यामुळे दर महिन्याला विद्यार्थी ईएमआयच्या माध्यमातून या कर्जाची सहजतेने परतफेड करू शकतात.

हे कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80(E) अंतर्गत शैक्षणिक कर्जावरील व्याजावर सूट मिळते. कोणत्याही विषयातील पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, सर्टिफिकेट प्रोग्राम आणि कोणत्याही विषयातील डायरेक्ट प्रोग्रामसाठी बँकेकडून अशा प्रकारचे कर्ज दिले जाते.

या अंतर्गत साडेसात लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. त्यासाठी विद्यार्थ्यांना 10.15% व्याजदराने व्याज द्यावे लागते. कोर्स कालावधी आणि रिपेमेंट हॉलिडे दरम्यान कर्जावर साधे व्याज आकारले जाते. एसबीआय शैक्षणिक कर्ज 11.15% व्याजदराने उपलब्ध करून देते.

या प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास विद्यार्थ्यांना प्रोसेसिंग फी सुद्धा द्यावी लागणार आहे. एका अर्जासाठी दहा हजार रुपये एवढे प्रक्रिया शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारले जाते. नक्कीच एसबीआयच्या या कर्ज योजनेमुळे विदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe