SBI Home Loan EMI : तुम्हीही नजीकच्या भविष्यात होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरंतर, देशभरातील विविध बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जाते.
गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी होम लोनच्या व्याजदरात कपात सुद्धा केली आहे. खरे तर गेल्या काही महिन्याच्या काळात आरबीआय कडून रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली होती त्यानंतर या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देखील आरबीआय कडून रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आले.
आरबीआयच्या या निर्णयानंतर देशभरातील विविध बँकांकडून होम लोनच्या व्याजरात सुद्धा कपात केली जात आहे यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वाधिक मोठ्या सरकारी बँकेचा सुद्धा समावेश होतो.
त्यामुळे जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. आता आपण एसबीआयच्या होम लोनची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआयचे सध्याचे होम लोन साठीचे व्याजदर, तसेच एसबीआय कडून 20 वर्षांसाठी 44 लाख रुपयांचे होम लोन घेतले गेले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार? याबाबतचे संपूर्ण कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेणार आहोत.
एसबीआयचे सध्याचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर एसबीआय कडून होम लोनच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. यामुळे होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. एसबीआय सध्या आपल्या ग्राहकांना किमान 8% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते.
मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर असून या व्याजदराचा फायदा फक्त अशाच लोकांना होतो ज्यांचा सिबिल स्कोर स्ट्रॉंग आहे. 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना एसबीआय कडून किमान 8% व्याजदर होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
44 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा हफ्ता?
जर एसबीआयकडून एखाद्या ग्राहकाला किमान 8% व्याजदरात 44 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर संबंधित व्यक्तीला मासिक 36,803 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर व्यक्तीला वीस वर्षांच्या कालावधीत व्याज आणि मुद्दल असे एकूण 88 लाख 32,720 बँकत भरावे लागणार आहेत. म्हणजेच एकूण 44 लाख 32 हजार 720 रुपये संबंधित व्यक्तीला व्याज म्हणून भरावे लागतील.