Share Market Tips : शेअर बाजारात नववर्षाच्या पहिल्या दोन दिवसात मोठी तेजी दिसली, म्हणून गुंतवणूकदार या नव्या वर्षात शेअर बाजारातून आपल्याला चांगला पैसा मिळेल अशी आशा बाळगून आहेत. म्हणून आता अनेकांना हर्षा भाईचा “शेयर मार्केट इतना गहरा कुंआ है, जो पूरे देश की पैसे की प्यास बुझा सकता है और मैं इस कुएं में डूबकी लगाना चाहता हूं!” हा डायलॉग आठवू लागलाय.
मंडळी, गेल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार असतानाही गुंतवणूकदारांना लार्ज कॅपमधून चांगला परतावा मिळाला होता. यामुळे यंदाचे वर्ष सुद्धा शेअर बाजारात इन्वेस्ट करणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल आणि शेअर बाजार एका नवा विक्रम प्रस्थापित करेल अशी आशा आहे. अशातच, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती आलीये.
टाटा मोटर्सवर जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA ने विश्वास दाखवला असून म्हणूनचं आता आगामी काळात हा शेअर विक्रमीभाव पातळीवर पोहोचू शकतो असे म्हटले जात आहे. तसेच काही ब्रोकरेज फर्म्स टाटा मोटर्सला बाय रेटिंग देत आहेत. म्हणून जर तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी टाटा मोटर्स हा पर्याय बेस्ट ठरू शकतो.
तुम्ही टाटा मोटर्स मध्ये गुंतवणूक करून या नव्या वर्षात चांगला पैसा कमवू शकता. दरम्यान आजच्या या लेखातून टाटा मोटर्सच्या शेअरची गेल्या पाच वर्षांची कामगिरी, सध्या टाटा मोटर्सची शेअर प्राईस किती आहे, ब्रोकरेज फर्मने टाटा मोटरसाठी काय टार्गेट प्राईसं दिलेली आहे ? हेच मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो, Tata Motors ची गेल्या पाच महिन्यातील कामगिरी विशेष खास राहिलेली नाही. कंपनीचा शेअर्स गेल्या ५ महिन्यांत उच्चांकी पातळीपासून 35% घसरला आहे. टाटा मोटर्स कंपनी शेअर 30 जुलै 2024 रोजी 1,179.05 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.
आता टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळतं आहे. शुक्रवारी 3 जानेवारी 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर हा स्टॉक पुन्हा तेजीत आला. दुसरीकडे, जागतिक ब्रोकर CLSA ने टाटा मोटर्स कंपनीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. तसेच, देशातील नामांकित नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे.
नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी बाय रेटिंग दिल्याने अनेकजण टाटा मोटर्सच्या शेअर खरेदीसाठी उत्सुक आहेत. महत्वाचे म्हणजे या शेअरसाठी 990 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आलीये. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा मोटर्स कंपनी शेअर गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये मजबूत परतावा देऊ शकतो.
सध्या टाटा मोटर्सचा शेअर 789 रुपयांवर आहे. शुक्रवारी टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तीन टक्क्याची वाढ झाली आणि हा स्टॉक 789 रुपयांवर पोहोचला. दरम्यान आता नुमोरा इंडिया ब्रोकरेज फर्म हा स्टॉक 990 रुपयांवर पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय.
टाटा मोटर्सच्या शेअर्स बाबत बोलायचं झालं तर शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 3.13 टक्क्यांनी वाढून 789 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 1,179 रुपये होती, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 717.70 रुपये होती. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,90,994 कोटी रुपये आहे. या स्टॉकने मागील ५ दिवसात 5.27% परतावा दिलाय.
पण, मागील १ महिन्यात टाटा मोटर्स कंपनी शेअर 1.53% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 19.13% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा मोटर्स शेअर 0.97% घसरला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स कंपनी शेअरने 312.87% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,386.61% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा मोटर्स कंपनी शेअर 6.48% घसरला आहे.