दिवसभर झोपतो अन अंधार पडला की ‘हा’ साप शिकारीसाठी बाहेर पडतो, दिसतोही खतरनाक ! पण……

आपल्या भारतातही सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात. यातील सर्वच प्रजाती विषारी नाहीत. अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या प्रजाती या विषारी आहेत. भारतात आढळणाऱ्या बहुतांशी सापाच्या जाती या बिनविषारीही आहेत असं सर्पमित्र सांगतात.

Tejas B Shelar
Published:
Snake Viral News

Snake Viral News : साप दिसला तरी आपले शरीर कापू लागते, अगदीच पायाखालची जमीन सरकते. खरेतर साप हा एक सरपटणारा आणि विषारी प्राणी आहे. पण, सर्वच साप विषारी असतात का? तर नाही. फारच कमी साप हे विषारी असतात. जगात सापाच्या असंख्य प्रजाती आहेत. आपल्या भारतातही सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात.

यातील सर्वच प्रजाती विषारी नाहीत. अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या प्रजाती या विषारी आहेत. भारतात आढळणाऱ्या बहुतांशी सापाच्या जाती या बिनविषारीही आहेत असं सर्पमित्र सांगतात. मात्र ही वास्तविकता असली तरी देखील दरवर्षी साप चावण्याच्या घटनांमुळे भारतात 58000हून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सर्पदंशामुळे भारतात मृत्यूचे प्रमाण फारच अधिक आहे. कारण की, साप चावल्यानंतर योग्य वेळी उपचार घेतले जात नाहीत. वेळ निघून गेल्यावर उपचार झाल्यास मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे साप चावल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टरकडे घेऊन जाणे हाच सर्वात बेस्ट पर्याय ठरतो.

खरेतर साप विषारी असो किंवा बिनविषारी असो, लहान असो किंवा मोठा असो सापाची भिती वाटतेच. त्यात कोणता साप किती घातक असेल याचा आपण काही अंदाजच लावू शकत नाही. एक साप तर असा असतो की, त्याचे डोळे रात्रीच्या अंधारात अगदीच वाघासारखे अन मांजरीसारखे चकाकतात यामुळे हा साप पाहिला की अंग थरथर कापू लागते.

पण, याच्या विषाबाबत बोलायचं झालं तर तो डसल्यावर जीव जात नाही. म्हणजे हा साप विषारीचं असतो पण याच्या चावण्याने जीव जात नाही. मात्र छोट्या छोट्या प्राण्यांना लकवा होतो. आम्ही ज्या सापाबद्दल बोलत आहोत तो आहे कॉमन कॅट. या सापाचे डोळे वाघासारखे आणि मांजरी सारखे भासत असल्याने याला कॉमन कॅट असे नाव पडले आहे.

हा कॉमन कॅट साप बिहारच्या वाल्मीकी व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. 2022 मध्ये हा साप या व्याघ्र प्रकल्पात आणला गेला होता. या सापाच्या संवर्धनासाठी या व्याघ्र प्रकल्पात हा साप आणला गेला असून या ठिकाणी यांची संख्या विशेष अधिक आहे.

हा साप असा आहे जो दिवसभर गाढ झोप काढून रात्रभर जागरण करत असतो. अंधार पडायला लागताच तो शिकारीसाठी बिळाबाहेर पडतो. तसंच जसजशी रात्र होते, तसतसे त्याचे डोळे चमकदार आणि भयानक दिसू लागतात.

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, कॉमन कॅट सापांचे डोळे कितीही भयावह असले तरी ते फार विषारी नसतात. परंतु त्यांच्यापासून लहान जीव-जंतूंना प्रचंड धोका असतो. त्यांचा आहारच लहान लहान किटक असतात आणि त्यांच्या विषानं लहान जीव, जंतू, पाल, बेडूक, उंदीर, तसंच पक्ष्यांना लकवा होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe