Snake Viral News : भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एका आकडेवारीनुसार देशात जवळपास 90 हजाराच्या आसपास लोक सर्पदंशामुळे मरण पावतात. खरे तर भारतात काही मोजक्याच जाती विषारी आहेत.
आपल्या देशात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत, यातील बहुतांशी प्रजाती या बिनविषारी आहेत. पण असे असतानाही साप चावल्यामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आपल्याकडे फारच अधिक आहे. देशात नाग म्हणजेच कोब्रा, किंग कोब्रा, रसल, वायपर, घोणस, मण्यार अशा काही सापाच्या विषारी जाती आढळतात.

दरम्यान भारतासह संपूर्ण देशात विषारी जातीचे जे साप असतात त्यांचे दात फारच छोटे असतात. पण आज आपण अशा एका जातीची माहिती पाहणार आहोत ज्याचे दात जवळपास दोन इंची लांब आहेत आणि जगातील सर्वाधिक विषारी साप आहे.
हा आहे सर्वाधिक लांबीचे दात असणारा जगातील सर्वाधिक विषारी साप
आम्ही ज्या सापाबद्दल बोलत आहोत तो जगातील सर्वात लांब टोकदार दात असणारा सर्वाधिक लांबीचा साप असून त्याला गॅबून व्हायपर या नावाने ओळखले जात आहे. पण हा क्वचितच वेळा लोकांना दिसतो.
महत्वाची बाब म्हणजे हा साप फारच प्राणघातक आहे, याच्या विषाचा एक थेंबही लोकांना मृत्युदंड देण्यासाठी पुरेसा असल्याचा दावा सुद्धा केला जातो. तथापि, हा प्राणघातक साप फारच शांत स्वभावाचा असतो. गॅबून हा एक अतिशय हुशार साप आहे.
हा साप हल्ला करून शिकार करतो. तो लहान सस्तन प्राणी किंवा पक्षी त्याच्या रेंजमध्ये येण्याची वाट पाहतो आणि कोणताही प्राणी त्याच्या रेंज मध्ये आला की तो लगेच त्याला चावतो आणि त्याला आपले भक्ष्य बनवतो.
गॅबून वाइपरचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दात हे जवळपास 2 इंच पाच सेंटीमीटर पर्यंत लांब असतात. पृथ्वीवरील कोणत्याही विषारी सापांपेक्षा या जातीच्या सापाचे दात सर्वात जास्त लांब असतात.
कुठं आढळतो हा साप
आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की हा साप आपल्या भारतात आढळतो का? तर याचे उत्तर आहे नाही. हा साप आपल्या भारतात किंवा भारतीय उपखंडात आढळत नाही तर तो आफ्रिका खंडात आढळतो.
उप-सहारा आफ्रिकेतील वर्षावन आणि सवानामध्ये आढळणारा हा सर्वात लांब आणि तीक्ष्ण दातांच्या सापांपैकी एक आहे. मात्र गॅबून वाइपर या सापाला शोधणे सोपे नाही. हा साप सहसा दिसत नाही.
अगदीच त्याच्या जवळ गेले तरच हा साप दिसतो. गॅबून वाइपरच्या शरीरावर तपकिरी, जांभळे आणि पानांसारखे डिझाईन्स असतात. ज्यामुळे हा साप गळून पडलेल्या कोरड्या पानांमध्ये शोधणे जवळजवळ अशक्य होते अशी माहिती सर्प तज्ञांनी दिलेली आहे.
हा साप जास्त हालचाल करत नाही, तो त्याच्या सभोवतालच्या वातावरणात इतका चांगल्या पद्धतीने मिसळतो की प्रशिक्षित साप आणि वन्यजीव तज्ञ देखील याला सहजासहजी ओळखू शकत नाहीत.