गुड न्यूज…! ‘या’ एसयूव्ही कारच्या खरेदीवर मिळतोय तब्बल साडेतीन लाख रुपयांचा डिस्काउंट, वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
SUV Car Discount

SUV Car Discount : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरे तर फेब्रुवारी 2024 मध्ये देशातील अनेक नामांकित ऑटो कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट ऑफर लावला आहे.

यामुळे या चालू महिन्यात जर तुम्ही नवीन कार खरेदीच्या तयारीत असाल तर तुमचे लाखो रुपये वाचू शकणार आहेत. दरम्यान आज आपण अशा एका एसव्ही कार ची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या खरेदीवर कंपनीकडून तब्बल साडेतीन लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बरोबर ऐकलंय तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदीवर एका नामांकित ऑटो कंपनीने लाखो रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. Citroen India या कंपनीने ही डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. ही कंपनी आपल्या Citroen C5 Aircross या लोकप्रिय कारवर 3.50 लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून देत आहे.

मात्र ही ऑफर लिमिटेड पिरियडसाठी राहणार आहे. ही ऑफर फक्त फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. अर्थातच आज जे ग्राहक ही गाडी खरेदी करतील त्यांना साडेतीन लाख रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.

मीडिया रिपोर्ट नुसार, C5 Aircross ची विक्री गेल्या काही महिन्यांमध्ये खूपच कमी झाली आहे. यामुळे कंपनीकडून या कारची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या लक्झरी एसयूव्हीवर 3.50 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट ऑफर केला जात आहे.

या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 36.91 लाख रुपये एवढी आहे. पण, कंपनीचे इतर मॉडेल जसे की Citroen C3 आणि Citroen C3 Aircross खरेदी करण्यावर कोणतीच सवलत दिलेली नाही.

दरम्यान, कंपनीकडून दिली जाणारी ही सवलत C5 Aircross या कारच्या 2023 च्या मॉडेलवर दिली जात आहे. Citroen C5 Aircross SUV मध्ये अनेक वर्ल्ड क्लास फीचर्स पुरवले जात आहेत. यात 2-लीटर डिझेल इंजिन आहे, जे 177ps ची पॉवर आणि 400nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

इंजिनसोबतच यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सुद्धा देण्यात आला आहे. हे दोन ड्राइव्ह मोड इको आणि स्पोर्ट आणि एकाधिक ट्रॅक्शन कंट्रोल मोडसह उपलब्ध झाली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 36.91 लाख ते 37.67 लाख रुपये आहे. ही 5 सीटर कार फील आणि शाइन या दोन प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe