Vastu Tips 2024 : वास्तुशास्त्र हे असे एक शास्त्र आहे ज्यामध्ये घर कसे असावे, घरात कोणत्या गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात, जसे की स्वयंपाक घर कुठे असावे, बाथरूम कुठे असावे? तुळस कुठे असावे, हॉल कसा असावा, हॉलमध्ये काय ठेवू नये? अशा असंख्य गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर घर बांधले गेले घरातील वस्तू ठेवल्या गेल्या तर अशा घरात सुख शांती नांदते असा दावा केला जातो.
याच वास्तुशास्त्रात सूर्य मावळल्यानंतर म्हणजेच सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबतही सखोल माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करण्यास शास्त्रात मनाई आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सूर्यास्तानंतर या गोष्टी चुकूनही करू नये
1) असं म्हणतात की सूर्यास्तानंतर घराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करू नये. सूर्यास्तानंतर देवी-देवतांचे घरात आगमन होत असते असा दावा शास्त्रात करण्यात आला आहे यामुळे सूर्यास्तानंतर घराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करू नये असे म्हटले गेले आहे. घराचे मुख्य प्रवेशद्वार हे थेट रात्री झोपण्याच्या वेळेस बंद केले गेले पाहिजे.
2) तुळस ही प्रत्येक हिंदू सनातन धर्माचे पालन करणाऱ्या लोकांच्या घरी असते. हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. मात्र याच तुळशीची पाने संध्याकाळी तोडू नयेत असे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. तुम्ही जर संध्याकाळी तुळशीची पाने तोडली तर तुम्हाला दोष लागू शकतो आणि यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते.
3) संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर काही गोष्टींचे दान करणे हिंदू धर्मात चुकीचे असल्याचे म्हटले गेले आहे. सूर्यास्तानंतर दही, मीठ, हळद आणि धन दान करु नये अशी माहिती शास्त्रात देण्यात आली आहे. या गोष्टींचे संध्याकाळी दान करणे चुकीचे असून अशुभ मानले गेले आहे.
4) संध्याकाळी चुकूनही कपडे धुऊ नये. विशेषता सूर्यास्तानंतर कपडे धुणे चुकीचे मानले गेले आहे असे केल्यास लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. त्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी नाराज होते आणि घरात दरिद्री येण्याची शक्यता असते.
5) काही लोक सूर्यास्तानंतर केस कापतात तसेच काही लोकनेते सुद्धा करतात मात्र वास्तुशास्त्रात असे करणे चुकीचे असल्याचे बोलले जाते. असे केल्यास घरात नकारात्मकता येते आणि क्लेश वाढतो असा दावा देखील केला जातो.
6) सायंकाळी अर्थातच सूर्यास्तानंतर कोणीही झोपू नये. संध्याकाळी झोप घेतली तर घरात नकारात्मकता वाढते. सायंकाळी झोपण्याची सवय असेल तर ती त्वरित मोडून काढा कारण की यामुळे प्रगती खुंटते असा दावा वास्तुशास्त्रात केला जातो.
7) सूर्यास्तानंतर घर झाडणे चुकीचे मानले गेले आहे. सूर्यास्तानंतर घर झाडल्यास माता लक्ष्मी कोपते आणि घरात दरिद्री येण्याची शक्यता असते.