आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदान कार्ड बनवता येते का ? निवडणूक आयोगाचा नियम काय सांगतो

Tejas B Shelar
Published:
Voter ID Card

Voter ID Card : भारतीय निवडणुक आयोगाने काल 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भारतात एकूण सात चरणात मतदान होणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला समाप्त होत आहे. यामुळे त्यापूर्वीच मतदान होईल अन नवीन सरकार स्थापित होणार आहे.

आपल्या महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी एकूण पाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. तसेच लोकसभेचा निकाल हा चार जून 2024 ला जाहीर केला जाणार आहे. म्हणजेच मान्सून सोबतच नवीन सरकारही सत्तेत येणार असे चित्र आहे.

निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असल्याने आता कालपासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.या आचार संहिता काळात मात्र अनेक गोष्टींवर निर्बंध लावले जातात. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदान कार्ड बनवले जाऊ शकते का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

खरे तर मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मात्र जे मतदानासाठी नुकतेच पात्र ठरले आहेत, ज्यांचे नुकतेच 18 वर्षे पूर्ण झाले आहेत अशा लोकांना मतदार यादीत नाव नोंदवावे लागणार आहे.

यामुळे अनेकांच्या माध्यमातून जर आचारसंहिता लागू झाली तर मतदार यादीत नाव नोंदवले जाऊ शकते का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आता आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संदर्भात निवडणूक आयोगाने कोणते नियम तयार केले आहेत हे आज आपण थोडक्यात पाहणार आहोत.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदान कार्ड बनवता येते का?

निवडणूक आयोगाच्या आचारसंहिताच्या नियमानुसार काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून आचारसंहिता कालावधीत देखील नवीन मतदान कार्ड बनवले जाऊ शकते. म्हणजेच आचारसंहिता कालावधीत देखील मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहिता लागू झाल्यानंतर दहा दिवसांपर्यंत नवीन मतदान कार्ड साठी अर्ज केला जाऊ शकतो. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केले जाऊ शकतात.

नवीन मतदान कार्डसाठी घरबसल्या कसा अर्ज करणार

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल वर NVSP सर्च करायचे आहे. यानंतर गुगलवर दिसत असलेल्या पहिल्या वेबसाईटवर भेट द्यायची आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे साइन अप करायचे आहे. साइन अप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन घ्यावी लागणार आहे. लॉगिन घेतल्यानंतर तेथे तुम्हाला फॉर्म 6 वर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती आणि काय आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. एवढे केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल आणि अर्ज जर योग्य असेल तर तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल.

मतदार यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर तुम्ही मतदानासाठी पात्र ठराल. मतदान करताना जर मतदान कार्ड नसेल तर तुम्ही इतर कागदपत्राचा वापर करूनही मतदान करू शकतात. जसे की पासपोर्ट, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांचा मतदानासाठी वापर होत असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe