काय सांगता ! गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे सुद्धा शरीरावर ‘हे’ 4 गंभीर परिणाम होतात, 90% लोकांना माहिती नाही

भारतात गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आणि गव्हाची खपत सुद्धा फार अधिक आहे. आपल्याकडे गव्हापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आपल्यापैकी अनेक जण दररोज गव्हाची चपाती खातात. आपण आवडीने गव्हाची चपाती खातो मात्र गव्हाच्या चपातीमुळे सुद्धा आपल्या शरीराला तोटा होऊ शकतो. गव्हाच्या चपातीमुळे सुद्धा आपल्याला काही आजार लागू शकतात.

Published on -

Wheat Side Effects : भारतात गव्हाची चपाती आणि ज्वारी, तांदूळ, बाजरीची भाकरीचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. जगातील सर्वाधिक जास्त गहू आपल्या भारतातच खपतो. गव्हाची चपाती, पुरणपोळी तसेच गव्हाच्या पिठापासून अनेक पदार्थ बनवले जातात आणि आपण सारे भारतीय मोठ्या आवडीने या पदार्थांचे सेवन करतो.

महत्वाची बाब म्हणजे गव्हाच्या चपातीमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे सुद्धा मिळतात. गव्हाच्या पदार्थांच्या सेवनामुळे तसेच गव्हाच्या चपातीच्या सेवनामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम आणि प्रथिनांचा भरपूर पुरवठा होतो. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.

पण तुम्हाला माहिती आहे का गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे सुद्धा मानवी शरीरामध्ये काही गंभीर परिणाम होतात. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण मेडिकल सायन्स मध्ये याबाबत अनेक शोध करण्यात आले आहेत.

अनेक डॉक्टर गव्हाच्या चपातीच्या सेवनामुळे आपल्या शरीरामध्ये काही गंभीर परिणाम होऊ शकतात असं म्हणतात. दरम्यान आता आपण गहूची चपाती खाल्ल्याने नेमके शरीरामध्ये काय बदल होतात ? यामुळे शरीराचे काय नुकसान होऊ शकते? याची माहिती जाणून घेणार आहोत.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाची चपाती ही कॅल्शियम आणि प्रथिनांनी समृद्ध असते. जी शरीरासाठी उपयुक्त ठरते. मात्र, जर फक्त गव्हाचीच चपाती खाल्ली गेली, तर तिचे काही गंभीर दुष्परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर होऊ शकतात.

शरीरावर काय परिणाम होऊ शकतो ?

वजन वाढत असते : आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, जे लोक नियमित गहू खातात, जास्त प्रमाणात गव्हाची चपाती खातात त्यांचे वजन वाढू शकते. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गव्हामध्ये वजन वाढवण्यास कारणीभूत ठरणारा एक घटक असतो. त्यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण अधिक असते अन यामुळे जास्त प्रमाणात गहू खाणाऱ्यांचे वजन वाढू शकते अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे. चपातीमध्ये असणारे घटक शरीरात चरबी साचवतात.

रक्तातील साखर वाढते : यासोबतच गव्हामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखर वाढवतात, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी गव्हाची चपाती कमी खावी असा सल्ला तज्ञांकडून यावेळी देण्यात आला आहे.

थकवा जाणवू शकतो : जाणकार लोक सांगतात की, गव्हाच्या चपात्या अधिक प्रमाणात जर खाल्ल्या गेल्या तर यामुळे सुस्ती चढते. अत्याधिक गहू खाल्ल्याने थकवा येत असतो. यामुळे शरीर जड होते आणि आळस वाढत असतो. याशिवाय जास्ती प्रमाणात गव्हाचे सेवन करण्यात आले, गव्हाच्या चपाती जास्त खाल्ल्यात तर हृदयाच्या आजारांचा धोका देखील वाढतो, कारण जास्त कार्बोहायड्रेट्स चरबीमध्ये रूपांतरित होतात अन याचा परिणाम म्हणून हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो.

पचन यंत्रणा खराब होऊ शकते : जाणकार लोक सांगतात की गव्हाचे अधिक प्रमाणात सेवन करणाऱ्या लोकांमध्ये पचनासंबंधी समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. जे लोक फक्त गव्हाची चपाती खातात अशा लोकांमध्ये पोट फुगणे, गॅस व अपचन अशा समस्या दिसतात. त्यामुळे गव्हाच्या चपातीचे सेवन योग्य प्रमाणातच करायला हवे. गव्हाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर याचे अपायकारक परिणाम पाहायला मिळू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News